पान:चांदण्यातील गप्पा.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लावण्यवती

८७

उतरण्याची परनवागी मागितली. ती त्याने मोठ्या संतोषाने दिली. मग ते तिघेही आपापले घोडे घेऊन, पर्णकुटिकेजवळ आले. त्यांनी आपले घोडे एका झाडाला बांधून, साधुमहाराजांचें दर्शन घेऊन, त्यांची आज्ञा केली त्या पर्णकुटींत आपले विहाड लावलें. मुरारजीनें पाणी वगैरे आणून संध्याकाळच्या जेवणाची तजवीज करण्याच्या उद्योगास तो लागला. कृष्णसिंह व लावण्यसिंह हे दोघे आसपासची जागा पाहाण्यास गेले. भोवतालची शोभा पाहून व शिकारीस जाण्यास हीच जागा योग्य असे ठरवून ते अगदर्दी संध्याकाळी परतले. बिहाडी आल्यावर पाहातात तो मुरारबाची रसोई तयार आहे. नंतर हातपाय धुऊन दोघांनींही काय गोड लागले तें खाऊन ते उठले. नंतर कांहीं वेळ इकडे तिकडे करून ते झोंपी गेले.

 दुसरे दिवशीं पहांटेस उठून कृष्णसिंह शिकारीस निघून गेला. जातांना शेजारच्या झोपर्डीत साधुमहाराजांचें दर्शन घेऊन 'माझ्या सोबत्यांना संभाळा !' असे त्यांस सांगून गेला.

 कृष्णसिंह तीनचार दिवसांनी परत येतो म्हणून सांगून गेला. हे तीन दिवस असल्या निर्जन प्रदेशांत दोघांनींच कसे घालवावे याचा विचार लावण्यवतीस पडला. दोन प्रहरचें जेवणखाण झाल्यावर चार घटका बोवाजींच्या झोपडींत जात जावें, असा तिने विचार केला. त्याप्रमाणे सकाळी इकडे तिकडे हिंडून फिरून तिने वेळ घालविला, व दोनप्रहरच्या नंतर वामकुक्षी करून तो वोवा- जींच्या झोपडींत गेला. ती झोंपडी चार मोठमोठचा आंव्यांच्या झाडामधोमध उत्तराभिमुख बांधिली होती. झोपडीच्या पूर्व बाजूला एक मोठें थोरले चिंचेच झाड होते. त्याला मोठी थोरली ढोल होती. त्या ढोलीच्या बाहेर लिंग वाढलेले, दोन दगड, कोठें मातीची चार भांडी व दोन पोखरलेले भोपळे पडले होते, व झाडाच्या खांदीला दोन काषाय वस्त्रे लोंबत होतीं. जवळच कांहीं जाई, जुई, मोगरा तुळशी, वगैरेची झाडें होतीं. पर्णकुटीच्या आसपास बकुळी, पारिजातक, बेल, सोनचाफा व कुसरीचे वेल पुष्कळ होते. त्यामुळे जिकडे तिकडे सुवास सुटला होता. ती जागा फारच रमणीय दिसत होती. पर्णकुटीच्या भोवतालचे वृक्ष जुने असल्यामुळे फार उंच उंच गेले होते. त्यांच्या मधूनमधून बालतरु असल्यामुळे वरून किंवा बाजूने सूर्याचें ऊन येण्यास जागा नव्हती. थोडी थोडी