पान:चांदण्यातील गप्पा.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८६
चांदण्यांतील गप्पा

नव्हे. तशांत मर्दुमकी करून नांव गाजविण्याचे हेच दिवस. कांहीं झालें तर ते याच वयांत होईल. आतां असे ऐदीपणांत दिवस घालवून पुढे जर रणांगणीं जाण्याचा प्रसंग आला, तर फाए जड जाईल. एकदां संवय गेली म्हणजे मग कसे होणार ? आतां जरी कोठें मर्दुमकी गाजविण्यास संधि नसली तरी मृगयेला जाऊन तरी ऐदीपणा घालविला पाहिजे असा विचार त्याचे मनांत रात्रंदिवस घोळत राहिल्याने त्याला क्षणभरही चैन पडेना. शेवटीं ही गोष्ट त्यानें लावण्य सिंहाजवळ काढिलीच.

 लावण्यवती ( कारण ती लावण्यवती होती है निराळे सांगणे नकोच ) म्हणाली की, 'तुम्ही कोठेही गेलांत तरी तुमच्यावरोवर आम्ही येणार. आम्हां दोघांना या ठिकाणी एकटें राहाण्याचे होणार नाहीं. आमच्याने एक क्षणही तुम्हांवांचून कंठवणार नाहीं. मग दिवस महिने कोठून निघणार ?? असे तिचें म्हणणे पडल्यामुळे त्याला पुनः कोहीं दिवस गप्प बसणे भाग पडकें. आणखीं कांही दिवस लोटल्यावर, पावसाळाविवसाळा संपल्यावर, पुनः एकदां कृष्णसिंहाने लावण्यसिंहाजवळ गोष्ट काढिली. त्या वेळीं त्यानें अशी व्यवस्था सुचविली कीं, सगळ्यांनीच तेथून आपला मुक्कम हालवावा, व मृगयेला जावयाचें त्या ठिकाणासून पांचसात कोसाच्या आंत बाहेर एखाद्या सुरक्षित जागेत बि-हाड करावें, व कृष्णसिंहाने तेथून मृगयेला जात जावें. हा वेत सर्वांना पसंत पडला. नंतर दिवस ठरवून एके पहांटेस ते तिघेही घोड्यावर स्वार होऊन मार्गास लागले. मार्ग कमीत कमीत एका डोंगराच्या पायथ्याशीं नदीच्या कांठी आले. त्या वेळीं दिवस कलला होता. यामुळे पश्चिमेकडून सकाळच्याच सारखी कोवळी उन्हाची तिरीप मोठी मजेदार भासत होती. नुक्ताच पावसाळा संपल्यामुळे वनश्रीही बहारीची दिसत होती. त्या वनाचा मोठा शांत, गंभीर, उदात्त असा देखावा दिसत होता. तो पाहून आमच्या ह्या मंडळीला तेथेंच मुक्काम करावा असें वाटले. सर्वोच्या मतें तो विचार कायम झाला. नदीची चढण थोडी चढून गेल्या- वर त्यांस दोनचार पर्णकुटिका दिसल्या. त्या पर्णकुटिकांच्या जवळ गेल्यावर कोणी बैरागी तेथे राहात असल्याचे त्यांस आढळले, व त्या पर्णकुटिका त्याच्याच आहेत असंही त्यांस समजले. नंतर कृष्णसिंह घोड्यावरून उतरून त्या वैराग्याकडे पायी चालत गेला, व त्याला त्याने साष्टांग नमस्कार घालून एका पर्णकुटीत