पान:चांदण्यातील गप्पा.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लावण्यवती

८५

सोईचें घर मिळून ते तेथेंच राहिले. आतापर्यंत मी मोघमच तीन प्रवासी असे म्हटले, पण हे प्रवासी कोण हे तुमच्या ध्यानांत आलेच असेल. पुरुषवेषधारी लावण्यावती आतां लावण्यसिंह झाली होती त मोगरी दासी मुरारजी झाली होती. स्वरूपसिंहानेंही पण आपले नांव बदलले होतें. तो आपणास आतां कृष्णसिंहजी म्हणवूं लागला. मुरारजी चाकर ( हुजन्य ), कृष्णसिंहजी कारभारी, व लावण्य सिंह यजमान अशा थाटाने ती मंडळी तेथें राहिली. यांना बाजारहाट करण्याची वेळ आलीच तर कारभारी ऐन तिन्हीसांजा बाहेर जाऊन बाजारचा जिन्नसपानस आणीत असत. तेथें त्या गांवचे माहितगार असे त्यांनी दोन चाकर ठेविले होते. लावण्यवतीनें आपलें आंगावरील जवाहिर आणिले होते. त्यापैकी एक एक जिन्नस विकून त्यांत तीं आपला गुजारा कसातरी करीत, व फार जपून आणि पुरवून पुरवून खर्च करीत. याप्रमाणे ती माणसे बरेच दिवस तेथें राहिलीं. इकडे त्यांचा शोध त्यांच्या राजधानीत हळूहळू चालला होता. चोहों मुलख हेर फिरत होते. परंतु त्यांना कांहीं यांचा शोध लागला नाहीं. कदाचित् मनापासून शोध करण्याची इच्छाही नसेल. लोकोपचा- रार्थ थोडा केला असेल. कर्मेंही असो. आमच्या प्रवासी लोकांस तरी निवांतपणीं एका जागी त्यामुळे राहातां आलें.

 याप्रमाणे चार वर्षे लोटली. बऱ्याच स्वस्थतेनें त्यांनी आपले दिवस घालविले. एखादा जिन्नस मोडावा, आणि चारसहा महिने किंवा वर्ष दोन वर्षे जिनसेच्या मोलाप्रमाणे त्या पैशांवर आपला चरितार्थ चालवावा. कोणाचें एक नाही ना दोन नाहीं. फक्त जिवास काय जें दुःख होत असे ते गतवैभवाचें व राजाच्या वियोगाचें. परंतु रात्रंदिवस काळजाला शब्दरूप सुया टोचणें, क्षणोक्षणी दुसन्यां कडून अपमान होणें, सुग्रास अन्न असले तरी विषासारखे वाटणें, या गोष्टींपासून होणारा त्रास सर्वथा चुकला; व तो भयंकर बंदिवास तर मुळींच टळला. असो.

 याप्रमाणे आणखी कांहीं काळ लोटल्यवर, कृष्णसिंहास वाटू लागले कीं, गांवाहून कोठें शिकारीसधिकारीस तरी जावें, कोठेंतरी वनश्री पाहावी, किंवा दुसन्या कोणाच्या तरी गांव जावें, पण या गाँवचा मुक्काम आता हलवावा. एखाद्या राज- घानींत जाऊन कांहीं खटपट करून सैन्यांत एखादी असामी मिळवावी; कांहीं तरी करावें. पण क्षत्रियांनी नुसते आळसांत दिवस घालविणे हा त्यांचा धर्म,