पान:चांदण्यातील गप्पा.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८४
चांदण्यांतील गप्पा

परंतु त्यांतून एकही कोणी समाधानाचा अथवा धीराचा किंवा भीतिप्रद असा शब्द उच्चारित नव्हता. ते आपल्या आपल्याशींच विचारांत अगदीं निमग्न झाले होते. याप्रमाणे ते चालतां चालतां शेवटीं एका नदीच्या कांठाला येऊन पोहोंचले. नदीजवळ आल्यावर त्यांना थोडें बरेंही वाटलें, असें दिसले.

 ते सर्व घोड्यावरून उतरून वाळवंटावर नदीच्या अगदी कांठाशी बसले. त्यांतून एक स्वार दुसऱ्याास म्हणतो: ' येथपर्यंत तर आलों. पण आतां याच्या पुढें कोठें जायचें आणि काय करायचें ?" त्यावर दुसरा म्हणाला: ' जिकडे वाट फुटेल तिकडे जायचें आणि वेळ पडेल तसे करायचें.' 'पण दिवसा कसे वागावें ? कोणी धरण्यास आलें तर ?' असे पहिला म्हणाला. त्यास दुसरा म्हणतो- 'कोण धरायला येतो ? आणि कोणाला एवढा शोध करण्याचें तरी अगस्य ? बरें झालें म्हणतील पिडा गेली एकदाची.' ' मनाची एक लज्जा नसेल, पण जनाची तर काहीं असेलना ?? असे पुन्हां पहिला म्हणाला. त्यावर दुसरा स्वार म्हणतो, " हो ! जनाची तरी ठेविली आहे लज्जा ! तिलाही पण मनाच्या लज्जेबरोबरच हद्दपार केली आहे !" पहिला म्हणाला: 'बरें तर, त्या दोघी लज्जा तरी आपल्या सोबतिणीच झाल्या म्हणावयाच्या. आपण हद्दपार झालों, तशा त्या दोघी ! मिळून आपण आतां पांच जण झालों तर !' दुसरा म्हणाला ' हो, समाधा- नाला जागा आहे खरी, आणि ती आपण शोधावी तेथें सांपडते हैं तरी एक बरेंच आहे.' पहिला म्हणाला: 'आपण जर एवढे धैर्य धरले तर मला काय कमी आहे ? ही एवढी पृथ्वी आणि वरील आकाश हीच माझी राजधानी व जेथें राहीन तोच राजवाडा होईल. हे माझे इस्तपादादि अवयवच माझे सेवकजन आहेत, आणि ते मोठे स्वामिकार्यदक्ष आहेत. यांच्यासारखे इमानी नौकर मला या त्रिभुवनांतही सांपडणार नाहींत. खरें कीं नाहीं ?" त्यावर दुसरा छातीस हात लावून म्हणाला: ' आणि हा सेवक नाहीं का एकनिष्ठ ?' पहिला म्हणाला: ' नाहीं कोणी म्हटले ?" असे म्हणून थोडें तोंड मुरडून तो पलीकडे झाला. नंतर ती तिघेही प्रातर्विधि उरकण्यास आळीपाळीने गेली. त्यांचीं स्नानें वगैरे होऊन ती सर्व पुन्हा मार्ग क्रमूं लागली.

 दोन प्रहरच्या सुमारास एका गांवांत त्यांनी मुक्काम केला. एक घर भाड्याने घेऊन तेथेंच कांहीं काळ लोटावा असा त्यांचा विचार झाला. त्याचप्रमाणे त्यांना