पान:गोमंतक परिचय.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण तिसरें. - कलावंत स्त्रियांवर धाडः-गायक समाजांतील कलावंत स्त्रियांना पोर्तुगीज अमलांत राहण्याची बंदीही याच सुमारास झाली. हुकूम तोडणाऱ्या कलावंतांना देहांत शिक्षेचा दंड ठरविला होता. त्यांना कोणीच आपल्या हद्दीत आश्रय देऊ नये. दिल्यास त्यांना शिक्षा ठरविल्या होत्या त्या अशाःदेणारा फिदाल्ग (बड्या घराण्यांतील सरदार ) असला तर त्याला एक हजार असर्फी दंड व मान मरातब वगैरेची जप्ती ही शिक्षा ठरविली होती; इतर वर्गातील असल्यास, कैद व हद्दपारी; ख्रिस्ती इसम असल्यास फटके व ९ वर्षे तारवांवर सक्तमजूरी आणि पाखंडी असल्यास शेंडी कापणे, भररस्त्यांत फटके मारणे व दहा वर्षे तारवांवर सक्तमजुरी इतकी शिक्षा मिळत असे.' अर्थात् ख्रिस्ती बनल्यापासून फटके भररस्त्यांत न मिळतां गुप्तरीतीने मिळत व सक्तमजुरी एक वर्ष कमी मिळत असे, इतका फायदा होई.: 2 - अठरावे शतकः-ह्या शतकांत जुलूम करायला नवीन असे आणखी कांहींच राहिले नव्हते. परंतु धर्मकारणाच्या पुरस्कर्त्यांना नवीन नवीन क्लप्त्या सुचल्याच. शेंडीवरील करः-इ. स. १७०५ साली शेंडीवर माणसी सुमारे आठ रुपये प्रमाणे कर बसविला गेला व १७०६ साली त्याची वसुली सुरू झाली. दरसाल सुमारे ८ हजार रुपये उत्पन्न त्या करांतून वसूल होत. - इ.स १७१५ त “ ख्रिस्ती भोयांनी हिंदूची मंचलें (डोलीसारखें वाहन ) उचलू नयेत. हिंदूंनां सरकारी मक्ते देऊ नयेत. कां की, तसे ते दिल्याने हिंदुलोक संपन्न होतात व ह्या रीतीने मिळविलेल्या संपत्तींतून पांखंडी देवांचा भजनपूजनाचा खचे चालवितात. अर्थात् हे प्रभूच्या गौरवास उणेपणा आणणारे असल्याने हा दोष सरकारवर येतो” असा हुकूम गोव्याच्या आर्चविषपच्या सूचनेवरून राजे साहेबांनी व्हॉयसरॉयांना दिला. पण व्हॉयसरॉयांनी उलट उत्तर दिले की, खिस्ती भोयांचा उपयोग हिंदुलोक करतात तो आपल्या सोयीसाठी करीत असून ख्रिस्ती लोक भोईपणा पत्करतात ते आपल्या श्रमांचा मोबदला मिळविण्यासाठीच पत्करतात. धर्माचा त्यांत बिलकूल संबंध नाही. तसेंच सरकारी उत्पन्नाच । हिंदूंकडून काढून ख्रिस्त्यांना दिल्यास त्यांत सरकारी तिजोरीचेच नुकसान होईल." परंत हे उत्तर कोणासच रुचले नाही. दुष्ट पाखंड्यांच्या नाशापुढे सरकार का रीला कोण पुसतो!