पान:गोमंतक परिचय.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय ८८ । हिंदूंनी सरकारांत असा अर्ज केला की, " अशा रीतीने आपल्याला विवाहसंस्कार करितां येत नाहीत. कारण धार्मिक विधीशिवाय संस्कार मुळींच संभवत नसल्याने, असे हे विवाह म्हणजे व्यभिचारच ठरतात. तेव्हां इतःपर आपल्याला उघड्या हवेंत, सूर्यप्रकाशांत विवाह करायला परवानगी मिळावी.” - व्हायसरॉय दों आंतोनियु पाइशू द सांद यांनी ही परवानगी ताबडतोब देऊन १६७८ तील हुकूम रद्द ठरविला. परंतु वरील हुकुमापेक्षाही ही नवी परवानगी गमतीची होती. “ विवाह समारंभ होड्यांतून करावे व होड्या सरहद्दीवरील नद्यांत राखाव्या. जवळपास ख्रिस्ती इसम असतांना मात्र विवाह करूं नयेत.” असा तिचा आशय होता. मासल्यासाठी हे इतकेंच पुरे. मातापुत्रांची ताटातूट:-मागे आपण पाहिलेच आहे की, पोरक्या मुलांचा ताबा घेऊन त्यांना ख्रिस्ती बनविण्याचा हुकूम, इ. स. १५५९ त सुटला होता. आणि इ. स. १५६०त ह्या हुकुमांतून १४ वर्षांवरील मुलांनां वगळण्यांत आले होते. तथापि पुढे १६४६त जेसुईट पाद्रि आंतोनियु सिकैर याने असा एक हुकूम मिळविला की, बाप वारलेल्या मुलाला आई व इतर वडील माणसें असली तरी, त्याचा ताबा घेऊन त्याला ख्रिस्ती करावें. अर्थातच हजारों मुलांना पकडण्यांत येऊन बेती येथील ख्रिस्ती शाळेंत कोंबण्यांत आले. पुष्कळ हिंदूंना हा जुलुम असह्य झाला व त्यांनी आपली घरें दारें उचलून मुसलमानी अमलांत नेली. पुढे इ. स. १६८१ त परत मुळचाच १५५९ तील हुकूम कायम करण्यांत आला. भाषेवरील संकट-इ. स. १६८४: हें वर्ष हिंदूंच्या मातृभाषेवरील संकटांच्या योगानें संस्मरणीय झाले आहे. आजवर ख्रिस्ती पाद्री व कौन्सिलने केवळ ग्रंथच जाळून टाकले होते. आणि धर्मप्रसारासाठी भाषेचा उपयोग होत असल्याने, पाद्यांनी देशभाषा शिकावी असा प्रयत्न सां पाब्लच्या कालेजांत करण्यांत आला होता. त्यास अनुसरूनच एका जेसुइट पायानें कोंकणी भाषेचे व्याकरण तयारही केले होते. फादर स्टीफन्सचे ख्रिस्तपुराण देखील याच प्रयत्नाचा परिणाम होता. पण १६८१ ते १६८६च्या सुमारास हा क्रम बदलला व “पोर्तुगीज मलखांत राहणाऱ्या एकंदर इसमांनी, मग ते कोणत्याही धर्माचे किंवा राष्ट्राचे असोत. पोर्तुगीज भाषाच बोलली पाहिजे. या साठी तीन वषाची मुदत देण्यांत येईल. त्या मुदतीनंतर देशभाषेचा उपयोग करणारास वाटेल ती शिक्षा करण्यांत येईल " असा हुकूम निघाला.