पान:गोमंतक परिचय.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण तिसरें. देवळें तर त्यांना अंतरलीच होती, पण आतां नारळीच्या भाटांच्या विध्वंसामुळे उपजीविकेचीच भ्रांति पडणार होती व तीही एक दोन वर्षे नसून, पुनः नारळी उत्पन्न होईतोवर, म्हणजे निदान आठ दहा वर्षे तरी पडणार होती. अर्थातच त्यांनी तहाचे बोलणे लावलें व व्हॉयसरॉयनेंही तें कबूल करून त्यांना जरतारी वस्त्रे देऊन कौल दिला. - पुनः एकदां शांतता झाली. पण जेसुइटांना तर तीच नको होती. इ. स. १५८३ त, जेसुईट पाद्रि रोदोल्फ आकाव्हीव्हा यांना, उल्लेखित पाद्रि आंतोनियु फ्रांसिश्कु, पाद्रि बॅनु, मडगांवचे व्हिगायु पाद्रि आफोंस पाशेकु, यांच्यासहवर्तमान कुंकळ्ळी येथें चर्च बांधण्यासाठी म्हणून पाठविलें. पाद्रीवर्गाबरोबर, नोकर वगैरे इतर माणसे मिळून जवळ जवळ पन्नास माणसांचा लवाजमा होता. आपल्या नाशास कारणीभूत झालेले ते उभय पाद्री दिसतांच, गांवकऱ्यांचे रक्त पुनः उसळलें आणि पाद्रींवर व त्यांच्या लवाजम्यावर ते बेफामपणे तुटून पडले. सर्व लवाजम्यासहित पाद्रींचा चेंदामेंदा झाला. दुमींगुश आगियार नांवाचा एकच इसम काय तो इतक्या माणसांतून बचावला. . परंतु गांवकऱ्यांचा हा गुन्हा अत्यंत क्रूरपणाने शासिला गेला. स्वतः व्हायसरॉय आणि रायतुरचा किल्लेदार, यांनी जलमार्गाने व खुष्कीने जाऊन त्या गांवाचा तिसऱ्याने नाश केला, व त्यांच्या कोमुनदादी जप्त करून कुंकळ्ळी व वेडे हे गांव जुवांव दा सील्व्ह याला बक्षिस दिले (ते आतां त्यांच्या वंशजाकडे-मार्केझिझ द फ्रोतैर इ आलोन यांच्याकडे आहेत )व बाकीचे दों पेट्ठ द काश्त्रु यांना बहाल करण्यांत आले. त्याने ते १५८५ साली जेसुईट कंपनीच्या नांवें केले. सरकारने हे दानपत्र प्रथम मंजूरच केले नव्हते. परंतु मागाहून जेसुइटांनी भगिरथ प्रयत्नानें त्यांचे उत्पन्न आपल्या सां पाब्लच्या कॉलेजकडे घेतले. इ. स. १८३२ सालीं, सनदशीर राज्यपद्धति पुकारली जातांच, आंबेली, वेळ्ळी व असोळणे हे तीन गांव सरकारने पुनः आपल्या ताब्यात घेतले ते अजून त्यांच्याचकडे आहेत. बंडाची अंतस्थ कारणे समजून घ्यायची झाल्यास, उपरोच्चारित फिलिफ नार शाव्हियर यांनींच लिहिलेल्या ग्रंथांत असें स्पष्टच सांगितले आहे की, अत्यत निद्य व तिरस्करणीय अशी साधनें उपयोगांत आणून जेसुइटांनीच ते गांव त्यांच्या हक्कदार गांवकऱ्यांकडून हिसकवून सरकाराकडून जप्त : Pg. 45