पान:गोमंतक परिचय.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय. म्यानच्या काळांत सासष्ट प्रांताचा तगादेदार, इश्तेव्हं रुद्रीगिश, हा सरकारी वसुलास तिकडे गेला असतां, कांहीं बाचाबाची होऊन मारला गेला. बाचाबाचीचे कारण दुसऱ्या कौन्सिलचे ठराव होते. त्या ठरावामुळे संतापलेल्या गांवकऱ्यांनी फोर ( सरकार देणे) देण्याची नाखुषी दाखविली व तिचा परिणास बाचाबाचीत झाला. पारामा जेसुइटांच्या सांगीवरून श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण इच्या फाल्गुनोत्सवाला इ. स. १५७५ मध्ये सरकारने बंदी केली. कोचीहून सरकारी पत्रव्यवहार घेऊन एक हरकारा गोव्याला व्हॉइसरॉयकडे जात होता त्याच्याकडून पत्रे हिसकून घेऊन कुंकळ्ळीकरांनी त्याला येशूच्या भेटीस पाठविले आणि बंडाचा पुकारा केला. आदिलशाहीकडे चालत असलेली लढाई बंद होऊन यावेळी सरकारला थोडासा विसांवा मिळाला होता. लागलीच दर्यासारंग, दों जील आनिशू माश्कारेन्यश, याला जलमार्गाने व रायतुरचे किल्लेदार, गोमिझ आनिशू द फिगेरेद याला खुष्कीनें, कुंकळ्ळी व असोळण्यावर हल्ला करण्यासाठी पाठविण्यांत आले. उभयतांनी मिळून कुंकळ्ळीची व असोळण्याची बरीच नासाडी केली. सैन्यानेच काम भागणार नाही असें वाटल्यावरूनच की काय, विशेषतः देवळांचा विध्वंस त्या शिपायांच्याने होणार नाही, असेही दिसून आल्यामुळे असावें, त्यांच्या मदतीला पाद्रि आंतोनियु प्रांसिइकु हे ओडलीचे व्हिगायु व पाद्रि पॅरु बर्नु हे कोलवेंचे व्हिगायु, ह्या जेसुइटांनांही तेथे रवाना केलें. ओडलीच्या व्हिगायुने असोळण्याच्या देवळांना आग लावण्याचे शतकृत्य केले व दुसऱ्याने कुंकळ्ळीच्या देवळांची राखरांगोळी करून टाकली. सैन्य परत गेलें व शांतता झाली. हिंदूंनी आपली घरे व देवळे पुनः जशाची तशी बांधून काढली. पुनः पाद्रि आंतोनियु प्रांसीइकु व पाद्रि पॅरु बर्नु यांनी चुगली करून सैन्य रवाना करविले. आणि परत एकदां त्या गांवांचा उच्छेद करण्यांत आला. मात्र यावेळी देवळांवर किंवा घरांवरच संक्रांत न येतां, त्यां बरोबरच नारळीची भाटे (बागा) व पेरलेली शेतें देखील उभय पाद्रींच्या चिथावणीवरून, त्या लोकांनी तोडून तुडवून उजाड करून टाकली. शेवटी आत्यंतिक अपमान म्हणून भग्न देवळाच्या जागेवर एक गाय तोडून तिच्या रक्तमांसाचा सडाही पण घातला. बिचारे असहाय्य गांवकरी ! गौरवरक्षणाचा मार्गच त्यांना राहिला नाही. पोर्तुगीजांच्या ह्या सैतानी व भीषण अत्याचारांमुळे घरें, दारे व