पान:गोमंतक परिचय.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय कत्तल झालेले पाद्री, हुतात्मे धर्मवीर म्हणून प्रसिद्धि पावले व पुढे त्यांनी पुष्कळ दैवीचमत्कार (!) केल्यामुळे, १८९३ त त्यांना पोपकडून साधुत्वाचा शिका मिळाला. आणि बिचारे हिंदु हुतात्मे ! त्यांची तर इतिहास नांवें देखील विसरला आहे !! बाहेर जाणारांवर डोईपट्टीः-राजकारणापेक्षां धर्मकारण श्रेष्ठ मानून त्याप्रमाणे राजसत्तेचे वर्तन सुरू झाले, म्हणजे राजकीय अधिकाऱ्यांपेक्षा धर्माधिकाऱ्यांना विशेष महत्व प्राप्त होऊन, राज्यकारभारांत गोंधळ माजल्याशिवाय राहत नाहीं असें इतिहास सांगतो. हीच परिस्थिति पोर्तुगीज साम्राज्यांत आमूलाग्र निर्माण झाली होती. हिंदूंवर झालेल्या जुलुमांप्रमाणेच राजसत्तेवर देखील सोळाव्या व सतराव्या शतकांत पाद्यांनी बरेच जुलुम केले होते. परंतु प्रस्तुत ग्रंथाचा तो विषय नव्हे. एकट्या जेसुईट कंपनीचेंच या बाबतींतील वर्तन पहावयाचे असल्यास, तें प्रस्तुत लेखकानें विद्यासेवकाच्या १९२७ च्या सप्टेंबरच्या अंकांत दिलेले आहे. पण आपण आपल्या विषयाकडे वळू. इ. स. १५८७ पासून पोर्तुगीज हद्दीत हिंदूंना धार्मिक संस्कार करण्याची बंदी असल्यामुळे, ते पोर्तुगीज हद्दींतून परसत्तेत जाऊन त्या ठिकाणी आपले विवाहादि संस्कार उरकीत असत. परंतु जेसुइटांनी यांतच पैसा उत्पन्न करावयाचा मार्ग शोधून काढला. बाहेर जाणाऱ्या प्रत्येक इसमावर त्यांनी कर बसवून तो कंपनीसाठी वसूलही करण्यांत येऊ लागला. इ. स. १६०२ मध्ये गोवा शहराने ह्या कराविरुद्ध पोर्तुगाल सरकारकडे तक्रार केली तेव्हां राजे फिलिप ३ रे ऊर्फ भक्तिमान् यांनी इ. स. १६०४ त व्हालादोलीद शहरांतून या कराच्या चौकशीचा हुकुम सोडला. परंतु तो कर काढून टाकल्याचा उल्लेख मात्र इतिहासांत नाही. विवाह संस्कारांवरील धाड:-येथवर धार्मिक संस्कारांची पुनः पुनः बंदी झालेली आपण पाहिलीच आहे. परंतु सतराव्या शतकांत विवाहसंस्कारावरच स्वतंत्रपणे धाड पडली होती. वास्तविक या बाबतींत सतराव्या शतकांतदेखील पुष्कळच हुकुम सुटले होते. आम्ही केवळ ठळक ठळकच देऊ. ३ इ. स. १६१३ त व्हॉयसरॉय दों जैरोनिमु आझेव्हेदु, यांनी असा हुकुम दिला की, " चर्चने जे दिवस लग्नास निषिद्ध ठरविले आहेत त्या दिवसांत, आणि इतर दिवसांतही, पाखंड्यांनी लग्ने करूं नयेत. केल्यास एक हजार असर्फी दंड होईल व त्यापैकी एक तृतीयांश बातमीदारास देऊन बाकीचा सरकारजमा केला