पान:गोमंतक परिचय.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण तिसरे. म्हणजे आरोग्याच्या बाबतींत व सुपीकपणांत अख्या कोंकणांतील उत्तमोत्तम जमीनीच आहेत. परंतु तूर्त लोकवस्तीच्या अभावी त्या साऱ्या पडीत आहेत. देवळांचा विध्वंस व बाटाबाटीचा जुलूम या गोष्टीला लढायीइतकाच कारणीभूत झाला आहे." पण या इशाऱ्याचा कांहींच उपयोग न होतां इ. स. १५९८ त हिंदु कारागिराने ख्रिस्ती शिष्यांना शिकविणे हा गुन्हा ठरविण्यांत आलाच. ( Pg 42) - त्यांच्या चिकाटीची धन्य असोः-परंतु इतक्याही जुलुमांतून वाट काढून मातृभूमीचा मोह न सोडवल्यामुळे, ज्यांनी तेथेच वस्ती केली होती त्यांची धन्य असो. आणि असे बहाद्दर तरी थोडे होते? एका गोवा शहरांतच त्यांची संख्या वीस हजारांवर होती. त्यांनी अडचणींना जुमानले नाही, ते जुलुमांनी गांगरले नाहीत, त्यानी संकटांस दाद दिली नाही, ते अपमानानें हतप्रभ झाले नाहीत. साऱ्या संकटांनां, साऱ्या अडचणींनां व साऱ्या जुलुमांनां, मोठ्या चिकाटीने आणि धैर्याने तोंड देऊन ते गोव्यालाच चिकटून राहिले! पण पापभीरु ख्रिस्त्यांना हे कसे सहन व्हावें. त्यांचे प्रयत्न पुनः जोराने सुरू झाले. इ. स. १६६० त राजे साहेब फिलीप ‘भक्तिमान' यांनां गोव्यांतून एक पत्र गेले की, "प्रभूच्या गौरवासाठी, व ह्या राज्याच्या आणि आमच्या धर्माच्या हितसंबंधाकरितां, अनिष्ट अशा ( हिंदूंनां ) लोकांना अपिलाचा किंवा तक्रारीचा हक्क न देतां ह्या बेटांतून हद्दपार करून पुनरेव गोवा बेटांत किंवा आसपासच्या मुलुखांत आल्यास, देहांत शिक्षेसहित सर्वस्वनाशाची शिक्षा देण्याचा अधिकार ( व्हाइसरायांना ) द्यावा." 'अपिलाचा किंवा तक्रारीचा हक्क न देतां' या शब्दांवरून असे वाटते की, तोवर बिचाऱ्या अनाथ हिंदूंनां न्यायसत्तेचा थोडा तरी फायदा मिळत असावा आणि तोच तर ह्या “पापभीरूंना" सलत होता. कुंकळ्ळीचे बंड व त्याचे परिणामः-येथे आपल्याला जरा मागे जावें लागणार आहे. ह्या बंडाची हकीकत बरीच महत्वाची असल्यामुळे ती येथे स्वतंत्रच दिली पाहिजे. मागे आम्ही सांगितलेच आहे की, कुंकळ्ळी, वेळ्ळी, आंबेली, वेडे, व असोळणे, ही गांवें दूर असल्यामुळे, तेथें जेसुईट पायांचा उपद्रव किंवा रायतुरच्या किल्लेदाराचा हात नीटसा पोंचत नव्हता. आणि त्याच कारणाने, सासष्ट प्रांतांतील इतर ठिकाणची बरीच मंडळी, या गांवांच्या आसऱ्यास गेली होती. तव्हा पासूनच (इ. स. १५६७) कुंकळ्ळीकरांवर जेसुइटांचा व किल्लेदाराचा दांत बसला. त्यामुळे इ. स. १५६९ सालापासून कुंकळ्ळीकरांच्या व जेसुइटांच्या (म्हणज सरकारच्या) झटापटी सुरू झाल्या. या झटापटींतच पांच सात वर्षे गेली. दर