पान:गोमंतक परिचय.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय पोटचा घांस अद्यापि काढून घेण्यांत आला नव्हता. त्याबाजूने आजवर प्रयत्न झाले नव्हते असे नाही, परंतु शेवटचा घाव अजून बसावयाचाच होता. (Pg. 28-29) पोटावर पायः-इ. स. १५७३ त खॉल गांवांतील गांवकऱ्यांनी फोर (सरकार देणे) न देतां उठावणी केली म्हणून तो गांव सरकारजमा झाला. ख्रिस्ती गांवकर ज्या कोमुनदादींत अल्पसंख्य होते, तेथे त्यांच्या गैरहजिरीत, हिंदु गांवकरांनां सभांतून बोलण्याची व ठराव आणण्याची बंदी झाली आणि बहुसंख्य ख्रिस्ती गांवकरांच्या कोमुनदादींतून त्यांना अजीबातच हाकलून देण्यांत आले. (Pg. 29-30) अपमानकारक हुकूम-वाहनांची बंदी:-इ. स. १५७४त ब्राह्मण पंडितांना व वैद्यांना, घोड्यावरून, डोलींतून किंवा पालखीतून फिरण्याची बंदी करण्यांत आली. आज्ञाभंग करणारास, पहिल्या खेपेस १० असा दंड, दुसऱ्या खेपेस २० असा दंड आणि वाहनांची जप्ती व तिसऱ्या खेपेस गुलामगिरी अशी शिक्षा फर्मावण्यांत येऊ लागली. सरकारवाड्यांत जाणाऱ्या वैद्यांना मात्र ती लागू करण्यांत आली नाही. इ. स. १४७५ त ही बंदी ब्राह्मणांप्रमाणेच इतरांनाही लागू करण्यांत आली. हुकूम मोडणारांस वाहनाची जप्ती व ५० असा दंड होऊन त्यांतील निम्मा बातमीदारास व निम्मा सरकारांत घेण्यांत येई. इ. स. १५८७ त गोव्यांत तिसरी ख्रिस्ती कौन्सिल भरली व तीत झालेल्या ठरावांन्वयें, हिंदूंना जानवें वापरण्याची बंदी झाली, विवाहसंस्कार बंद करण्यांत आले व अनिष्ट हिंदूंना हद्दपारीचा हुकूम जारीने अमलांत आला; या संस्कारबंदीच्या हुकुमाला १५९४ सालींच सरकारी मान्यता मिळाली. ( Pg. 42) इ. स. १५९२ त चौथी कौन्सिल भरली व तीतील ठरावांनी हिंदु नापिताकडून स्मश्रु करविणे व हिंदु नोकर ठेवणे, ह्या गोष्टी नवख्रिस्त्यांना निषिद्ध ठरविण्यात आल्या. इ. स. १५९५ साली या साऱ्या जुलुमांचा कळस झाला. त्यांचा झालेला परिणाम 'तोंबु जराल', (Tombo geral) नांवाच्या इतिहासांत फ्रांसीइकु दीयश नामक लेखकाने पुढील प्रकारे वर्णन केला आहे. “सासष्टींतील उत्कृष्ट शेती