पान:गोमंतक परिचय.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण तिसरें. तील देवळांचा नाश झाला. रायतुरच्या चर्चमध्ये असलेल्या त्याच्या थडग्यावर खालील मृत्युलेख अद्याप चमकत आहे. रायतुरचा किल्लेदार दियोग रुद्रिगिश, ज्याने ह्या प्रांतांतील सारी देवळे पाडून टाकली, त्याचे हे कबरस्थान आहे. त्याचा मृत्यू २१ एप्रील सन १५६७ त झाला. (Pg. 24-26 व Bosq. Hist. Vol. 1 Pg. 109) ____बारदेश प्रांतावर धाड, देवळांचा नाशः-इ. स. १५६९ त बारदेश प्रांतांतील सारी देवळे पाडून टाकण्यात येऊन त्यांचे व सासष्टींतील देवळांचें राहिलेले उत्पन्न सरकारांत जप्त झाले. यावेळी देवळांच्या उत्पन्नाची चौकशी झाली व तींत असे दिसून आले की, 'गांवकर पळून गेल्यामुळे तीनतीनदां दंवडी पिटली तरी, वांइगणे (रब्बी ) पेरायला कोणीच येईना. फक्त कुंकळ्ळी सांखवाळ, मुरगांव, इसी व केळशी एवढी गांवें मात्र वसली आहेत. कुठाळ (कुशस्थळी) गांवांत तर खाऱ्या पाण्याने सारी जमीन नासून गेल्यामुळे, सर्द ( खरीप ) किंवा वांइगण कांहींच करतां येईना.' ___इ. स. १५७१ त ह्या परिस्थितीने सरकारचे डोळे पुनः उघडले व पोर्तुगालहुन पुन: हुकूम सुटले की, “ हिंदूंवर होणान्या जुलुमांची चौकशी करावी. त्यांना बेकायदेशीरपणे गुलाम बनविले गेले असल्यास, त्यांची जिंदगी लुटली गेली असल्यास, त्यांच्या मर्जीविरुद्ध त्यांकडून पैसे उपटले गेले असल्यास, त्याचा सर्व निवाडा व्हावा व त्यांतच आपला पुरावा सादर करण्याची नोटीस, हिंदूंना असतील तेथें देण्यात यावी. या सर्व प्रकारची योग्य ती दुरुस्ती व्हावी, मग तिजमुळे कोणत्याही व्यक्तीला व कितीही मोठ्या दर्जाच्या इसमांनां दुखवावे लागले तरी हरकत नाही." हिंदूंना वाटले की, आतां मात्र आपला न्याय झाल्याशिवाय राहत नाही. न्यायाचा, शांततेचा व सहिष्णुतेचा हाच प्रभातकाळ आहे. मोठ्या आशेने भन्न देवालयांच्या तलावांत त्यांनी स्नाने केली व देवांकडे केलेले मोठमोठे नवस फेडले. पण हा त्यांचा भ्रम क्षणभंगुर होता आणि तो अल्पावधीतच नष्ट झाला. आजवर त्यांचे धार्मिक स्वातंत्र्यच कायतें नष्ट करण्यांत आल होत. त्या पाखंड्यांना याही पेक्षां जबर शिक्षा मिळावयाची राहिलीच होती. त्यांचा