पान:गोमंतक परिचय.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय त्याच सालीं गोव्यांत पहिलीच ख्रिस्ती कौन्सिल भरली. तीत असे ठराव पास झाले की, "कोमुनदादींच्या लिलावांत ख्रिस्त्याचा सवाल हिंदूच्या सवालाइतकाच असल्यास ख्रिस्त्यालाच मक्ता द्यावा. कोमुनदादींचे कुळकर्णी, मुखत्यार, वसुलदार, इत्यादि अधिकारी ख्रिस्तीच असावे." इतकेच नव्हे, तर "ख्रिस्त्यांनी ख्रिस्तीतरांशी संभाषण देखील वर्ज करावें व सैतानाची (हिंदूंची) सारी स्थाने, म्हणजे देवळे, झाडे, दगड, वगैरे भंगून टाकून, पाखंड्यांचे विवाह, अंत्येष्टि, व्रतबंध, होम हवन, इत्यादि सारे संस्कार बंद करावे; आज्ञाभंगास कडक शिक्षा फर्मावाव्या; निस्तीतरांना कोणताही हुद्दा देऊं नये व दिल्यास तो गुन्हा समजला जावा" असाहि हुकूम याच सालीं सुटला. ( Pg. 22-23) सासष्टकरांवर हल्ला; देवळांचा विध्वंसः-याच खाली सासष्टकरांना धर्मच्छलाच्या वणव्याने घेरले. रायतुरचा किल्लेदार, “ बहाद्दर" दियोग रुद्रिगिश, याने लोटलीच्या गांवकरांना किल्यांत हजर होण्याचा हुकूम केला होता. पण तो त्यांनी पाळला नाही. म्हणून चिडून त्याने येथील मुख्य (श्रीरामनाथाच्या) देवालयाचा विध्वंस केला. लोटलीकरांनी न्यायासनासमोर आपली तक्रार मांडली व न्यायाधिशांनी, 'किल्लेदाराने तें देऊळ पूर्वीप्रमाणेच बांधून द्यावें," असा हुकुमनामा दिला. परंतु गोव्यांतील जेसुइटांच्या प्रोव्हिसियालाने (मुख्याधिकाऱ्याने ) व आर्चबिशपनें त्या हुकूमनाम्याविरुद्ध तक्रार केल्यामुळे, व्हाइसरॉय दो आंतांव द नोरोन्य यांनी, तो निंद्य (indecente) ठरवून, किल्लेदाराला सासष्ट प्रांतांतील सारीच देवळे पाडून टाकण्याचा हुकूम फर्मावला. अर्थातच त्याने वेणे येथील श्रीम्हाळशेच्या देवळापासून सुरवात करून २८० देवळांचा विध्वंस केला. देवळांचे लाकूडसामान तारवांच्या गोदीकडे गेलें व उत्पन्नापैकी बरेचसे उत्पन्न १५७२ साली त्याच किल्लेदाराला बक्षिसादाखल मिळाले.' अशारीतीने सासष्ट प्रांतां १. इ. स. १५६७ सालींच वारलेल्या दियोग रुद्रिगला हे बक्षिसपत्र मिळणे शक्य दिसत नाही. ते त्याच्या विधवेलाच मिळाले असावें. तिनंही तें उत्पन्न इ. स. १५८४ त रायतुरच्याच दोघां ख्रिस्त्यांना विकले. पुढे इ. स. १६०३ साली त्यांतील बरीचशी इस्टेट अंतोनियु रुद्रीगिश नांवाच्या ख्रिस्त्याला सरकारने बक्षिस दिली. कारण ख्रिस्ती धर्म स्वीकारासाठी त्याने आईबाप, गणगोत इत्यादि सारें सोडले होते व जेसुइट पायांनां बाटाबाटींत मदत केली होती. शेवटी ही सारी इस्टेट मिझेरिकोर्द संस्थेला बहाल करण्यांत आली, ती अद्यापिही तिजकडेच आहे. इस्टेटीचे उत्पन्न त्यावेळी दहा हजार असपाचे होते. TE