पान:गोमंतक परिचय.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. ७९ प्रकरण तिसरे. इंकिझिसांवांचे आगमनः-याच दरम्यान युरोपभर गाजलेल्या इंकिझिसांवांचा (धर्मसमीक्षणन्यायसभेचा) गोव्यांत उदय झाला. आजवरचे हिंदुविषयक कायदे लक्ष्यात घेतल्यास, इंकिझिसांवांने गोव्यांत काय काय अत्याचार केले असतील, त्यांची पूर्ण नसली तरीपण बरीच कल्पना करता येईल. त्याचा इतिहास मोठा आहे पण तो स्वतंत्रपणेच प्रसिद्ध करण्याचा विचार असल्यामुळे येथे दिला नाही. इंकिझिसांवाला त्यावेळी हिंदुसमाजांत व्हडले घर (थोरलें घर) असें टोपण नांव मिळाले होते. इ. स. १५६१ त साऱ्या जमिनी पडीत राहिल्या. नद्यांची पात्र मातीने भरून आल्याकारणानें, “ लोकांनी परत यावें, त्यांच्या जमिनी त्यांस परत मिळतील" असा कौल पोर्तुगालहून मिळाला होता. परंतु ह्या कौलाविरुद्ध आर्चबिषपनें व जेजुइटांनी तक्रार केल्यामुळे, इ. स. १५५३ तच त्याच्याविरुद्ध दुसरा हुकूम, राजे दों सेबाश्तियांव यांनीच पाठवून नेहमी आर्चबिषप व जेसुईट यांच्या सल्लयानेच वागण्याचा उपदेश व्हाइसरॉयांना केला. ( Pg. 21) इ. स. १५६३ त उपरोक्त फेर हुकुमान्वयें हद्दपारीचा कायदा पुनः जारीने अमलांत आला. मात्र ह्या खेपेस ही हद्दपारी ब्राह्मण व दैवज्ञ ब्राह्मणांपुरतीच नसून सार्वत्रिक होती. ख्रिस्ती समाजाला नुकसानकारक नसणारे जे शेतकरी, वैद्य, सुतार, लोहार, व्यापारी, मक्तेदार वगैरे असत, त्यांना मात्र ह्या हद्दपारीतून वगळण्यांत आले होते. अर्थात् सर्वच उजाड झाले. ज्यांना पुरुषसंतति होती, त्यांनीच मात्र कोमुनदादीतील हक्कांच्या लोभामुळे, पोर्तुगीज हद्दीत घरेंदारें ठेविली. इतर लोक केवळ उपरी कुळांप्रमाणे राहून जरा कुठे जुलमाचे चिन्ह दिसतांच परहद्दीत (आजच्या नव्या काबिजादीत) पळून जात. (Pg. 21) इ. स. १५६६ त हद्दपारीचा अधिकार आर्चबिषपच्या हाती आला. आणि कोमुनदादीचे कुळकर्णी हिंदू असू नयेत, असल्यास त्यांनी आपली वतने ख्रिस्ती इसमांना विकावी. तसेंच 'गांवकीचा हक म्हणजे गांवकरांना जीव की प्राण वाटत असल्यामुळे त्यांना कोमुनदादींत मज्जाव करावा म्हणजे ते लागलेच ख्रिस्ती होतील' असे हुकूम सुटले. ( Pg. 21) इ. स. १५६७ त हिंदूंनां आपली धर्मपुस्तकें बाळगण्याची बंदी झाली. प्रार्थनेला नवख्रिस्ती हजर न राहिल्यास, त्यांपैकी अभिजात वर्गियांस दंड कर. ण्याचा व गरिबांस पाल्मातॉर्य ( कलथ्याच्या आकाराचे तळहातावर मारण्याच लांकडी शस्त्र ) मारण्याचा अधिकार पाद्रींना देण्यांत आला.