पान:गोमंतक परिचय.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय ७८ दों जुवांव तिसरे यांनी दिला. (Os Hindus de Goa e a Republica Portuguesa por António de Noronha Pg. 9) इ.स. १५४८ सांत झै जुवांव द आल्बुकर्क नांवाच्या विषपनें लोकांची पुस्तकें एकत्र करून पाखंडमतखंडनार्थ जाळून टाकली ( Pg. 12) इ. स. १५५७ त हिंदूनां सरकारी नोकऱ्यांतून हांकण्यांत आले व अशा रीतीने आल्बुकर्कच्या मुळच्या जाहिरनाम्यांतील, "ठाणेदारीसहीत साऱ्या सरकारी जागा हिंदूंच्याच हाती ठेवण्याच्या वचनाला हरताळ फासला गेला. (Pg. 14-15) इस. १५५९ त पुनः हाच हुकूम सुटला व “जोडीला हिंदूंच्या व ब्राह्मणांच्या वतीची कोणतीच सरकारी कामें, दस्तऐवज किंवा इतर सरकारी कामकाज, सरकारी अम्मलदारांनी करूं नयेत. केल्यास अम्मलदारांस बडतर्फी व हिंदूंस गुलामगिरी अशी शिक्षा फर्माविण्यांत आली, मृत हिंदूंच्या विधवा किंवा मुली ख्रिस्ती धर्मांत आल्यास, मनूच्या कायद्यास न जुमानतां, त्यांना मृत इसमाची सारी संपत्ति वांटून द्यावी; स्त्रिया ख्रिस्ती धर्मात न आल्यास, मृत इसमाचा जो कोणी दायाद बाप्तिस्मा घेईल, त्याला ती संपत्ति मिळावी; पाखंडी उत्सव घरांतून चालले असतील, तर त्यांची चुगली करणारास पाखंड्याच्या संपत्तीचा अर्धा वांटा बक्षिस देऊन अर्धा त्या भागांतील चर्चला मिळावा व पाखंड्यास आजन्म गुलागिरीची शिक्षा द्यावी; (Pg. 15) त्याच प्रमाणे मातापितरे किंवा वडील माणसें नसणाऱ्या हिंदु मुलांना, सरकारने आपल्या ताब्यात घेऊन त्यांना सां पाव्लच्या कॉलेजांत बाप्तिस्मा द्यावा; (Pg. 17) व ख्रिस्ती होणाऱ्यांना दीझिमुश माफ असावें ( Pg. 16 ) असे हुकूम सुटले. इ. स. १५६० त ब्राह्मणांना हद्दपारीचा हुकूम सुटला. " आपली चीजवस्त व स्थावर मिळकत ख्रिस्त्यांना विकून एक महिन्याच्या अवकाशांतच त्यांनी गोवें सोडावें, न पेक्षां आजन्म गुलामगिरी व मिळकतीची जप्ती ही शिक्षा देण्यांत येईल." असा त्या हुकुमाचा इत्यर्थ होता. हे थोडे वाटल्यामुळेच की काय, पुनः त्याच वर्षी, “सुवर्णकारांनी आपली मुलेबाळे घेऊन दहा दिवसांच्या आंत गोवें सोडावें, नाहीतर आजन्म गुलामगिरी व जिंदगीची जप्ती होऊन तींतील अर्धी बातमीदारास व अर्धी सां तोमेच्या चर्चला देण्यात येईल" असा दुसरा हुकूम सुटला. त्याच साली सासष्ट प्रांतांतील ४०९ माणसांना पकडून मोठ्या समारंभाने बाप्तिस्मा देण्यांत आला. ( Pg. 16-17)