पान:गोमंतक परिचय.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७७ प्रकरण तिसरे.. दा नोरोन्य, यांच्या " गोव्यांतील हिंदु व पोर्तुगीज रिपब्लिक" नामक ग्रंथांतून घेतलेला आहे. उभय ग्रंथकार ख्रिस्ती समाजांतीलच आहेत. वाचकांनी खालील इतिहास एकदां तरी नजरेखाली घातल्याशिवाय राहूं नये, अशी त्यांना लेखकाची नम्र विज्ञापना आहे. बिशपच्या गादीची स्थापनाः-गोवें सर केल्यावर लागलीच त्या शहरांत आल्बुकेर्कनें एक क्याथेड्रल उघडलें होतें व आपल्या शिपायांपैकी कित्येकांची लग्ने "नायट्यांच्या" (मुसलमान चांच्यांच्या) पकडलेल्या स्त्रियांशी लावून दिली होती. सतीची चाल त्याला रानटी वाटली म्हणून त्याने बंद करविली. परंतु त्याच वेळी प्रजाजनांना आपापल्या धमाप्रमाणे व चालीरीतींप्रमाणे वागण्यास पूर्ण मुभा देणारा कौल जाहीरनाम्याच्या द्वारे त्याने दिला होता. पुढे सन १५२६ त आफोंस मेशीय याने गोमांतकीय प्रजेला जो कौल ( फॉराल ) दिला, त्यांतही ह्या हक्काचा पुनः उल्लेख केला होता. पण १५३४ त पोर्तुगीज सरकारने गोव्यांत विशपची गादी स्थापन केली. ह्या बिशपनां गोव्यांत प्रारंभी कांहींच काम नव्हते. कारण ख्रिस्ती लोकांची संख्या केवळ पोर्तुगालहून आलेल्या शिपाई लोकांपुरतीच मर्यादित होती. ती वाढविण्यासाठी “ इतका काळ पर्यंत सैतानाच्या हवालीं झालेल्या ह्या देशाची व लोकांची प्रभूला आठवण झाली व त्यांना तारण्यासाठी या देशांत असलेली सारी देवळे, त्यांतील एकही राहूं न देतां, नष्ट करण्याची त्या प्रभूने प्रेरणा केल्याचा" पहिला सरकारी हुकूम इ. स. १५४१ त सुटला. तिसवाडींतील सारी देवळें “प्रभूच्या प्रेरणेनें" धुळीस मिळाली व त्या देवळांची इस्टेट कोमुनदादींस वांटून देण्यांत येऊन त्याबद्दल कोमुनदादींवर “जोरजुलुमाशिवाय व त्यांच्याच राजी खुषीने " ७८६ असर्त्यांचा कर लादण्यांत आला. ( Bosquejo Histórico das Comunidades de Gôa por Filipe Nery Xavier, Vol. I Pg. 106) जमिनीचे उत्पन्न केवळ २८०० असर्फी होतें ही गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी आहे. इ. स. १५४५ सांत जेसुइटांच्या नुकत्याच स्थापन झालेल्या, सेंट पॉलच्या कॉलेजला सरकारने ह्या जमिनी बक्षीस दिल्या. परंतु कोमुनदादींवरचा कर मात्र तसाच राहिला. (Bos. His. Vol. I Pg. 107 ). इ. स. १५४६ सांत "गोव्यांतील पाखंड मत नष्ट करा, त्यांतील सारी देवळे व मशीदी जमीनदोस्त करा; पाखंडी व ब्राह्मणी उत्सवास मनाई करा व लाकूड, माती किंवा धातूची मूर्ति करणारास कडक शासन करा." असा हुकूम राजसाहब