पान:गोमंतक परिचय.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय. ७६ इंग्रजी राज्यपद्धति जुलुमाची असेल, नव्हे आहे. त्यांनी प्रजाजनांना पिळूनही काढले असेल. पण एक मेहेरबानी केली ती मात्र विसरतां उपयोगी नाही. त्यांनी प्रजेला दिलेले शिक्षण धर्माधिकाऱ्यांच्या अश्मीभूत झालेल्या सांच्यांतून न देतां, विद्यार्थ्यांची दृष्टि काही थोड्या प्रमाणानेंच का होईना, पण विकसित करून त्यांना स्वतंत्र विचारशक्तीची प्राप्ति करून दिली. राष्ट्रीयत्वाची वाढ ह्या स्वतंत्र विचारामुळेच हिंदुस्थानांत झपाट्याने झाली. त्या शिक्षणामुळे लोकांना जगाकडे पाहण्याची नवदृष्टि प्राप्त होऊन ते आपल्या हक्कांस जपणारे निघाले. आमची गोष्ट तशी नव्हती व तूर्तहि नाही. सर्व प्रगतीचा पाया में शिक्षण, तें मुस्कट दाबींत, थापाथापीत व चाणाक्यनीतींत प्रवीण अशा जेझुइटांसारख्या धर्मवेड्या पायांकडे बराच काळ होते; प्राथमिक शिक्षण अजूनही राजभाषेतूनच चालतें; शिक्षणांत पुढारलेला ख्रिस्ती समाज, भूतकालाभावामुळे भविष्यहीन बनून केवळ आजच्या दिवसापुरता व पोटोबा पुरताच पाहणारा; भविष्यकालाची अंधुक तरी कल्पना असणारा हिंदुसमाज, राज्यकारभारांतील आपला हक्काचा अर्धा वांटा मिळविण्यांत, केवळ १९ वर्षांच्या तुटपुंज्या तयारीने ख्रिस्ती समाजाकडे अखंड झुंझ खेळण्यांत ग्रासून गेलेला; अर्थात् खास प्रजेच्या न्याय्य हक्वांची बजावणी करून घ्यायला तो रिकामा नाही व राज्यकारभाराच्या एकंदर आंगांउपांगांत ही त्याची हक्काची जागा जोवर त्याला मिळाली नसेल, तोंवर तरी त्याची या बाबतीत हीच स्थिति कायम राहणार; तेव्हां या परिस्थितीचे नवल वाटायला नकोच. प्रकरण तिसरें. पोर्तुगीजांनी केलेल्या जुलुमांची जंत्री, प्रास्ताविक विज्ञापनाः-प्रस्तुत इतिहासाच्या कथनास सुरुवात करण्यापूर्वी, दोन प्रास्ताविक शब्द वाचकांना सांगावयाची परवानगी घेतो. यांतील शब्दान् शब्द सरकारी कागदपत्रांतून आणि सरकारमान्य व इतिहास संशोधक असे जे फिलिप नॅरि शाव्हियर नांवाचे सुप्रसिद्ध गोमांतकीय विद्वान होऊन गेले त्यांच्या. “गोमांतकांतील कोमुनदादींच्या इतिहासाची रूपरेषा" या प्रमाणभूत ग्रंथांतून किंवा पणजीच्या हायकोर्टाचे आजचे सर न्यायाधीश, दोतोर आंतोनियु