पान:गोमंतक परिचय.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय ७४ माला कोमुनदादीचा गांवकर ( हक्कदार ) समजण्यांत येते. पण जणाचा हक्क तसा नसतो. तो प्राप्त व्हावयाला त्या त्या कुटुंबांत जन्मच घ्यावा लागतो. जणकारांच्या व तक्षिमदाराच्या कोमुनदादींची मूळची जी कुटुंबें होती त्यांना वांगड म्हणतात. ___ कोमुनदादींच्या शेअर्सची मूळ किंमत वीस रुपये होती. पण फायदा कमीजास्त सुटत असल्याने, संपन्न कोमुनदादींत ती शंभराच्या घरांत देखील गेली आहे. व उलट पक्षी कित्येकदां मूळांतच खालींही गेली आहे. संपन्न जणकरांच्या कोमुनदादींत जणाला (प्रत्येक भागीदाराला ) वार्षिक तीन तीनशे रुपये देखील मिळतात आणि कित्येक कोमुनदादीत पुरते दोनही मिळत नाहीत. तरीपण ह्या हक्काचा मोह गोवेकरांत इतका प्रबळ असतो की, हे वतनी दोन रुपये वसूल करायला पदरचे पैसे खर्च करणारे जणकार पुष्कळच असतात. फायदा वांटण्याच्या चोपडीत जणकरांची नांवें दाखल व्हायला त्यांनी आपल्या अस्तित्वाचा दाखला दरसाल ठराविक मुदतींत कुळकर्ण्यास पटवावा लागतो. मुरगांवची सुधराई कमिटी:-वास्कोदागामा शहर व कुडचडे उपनगर सुधारण्यासाठी म्हणून ही कमिटी १९१९ साली निर्माण करण्यांत आली. प्रारंभी ह्या कमिटीची रचना खालीलप्रमाणे होती. प्रेसिडेंट:-रेल्वे व मुरगांव बंदरावरील देखरेख खात्याचे डायरेक्टर. सभासदः-१ बंदर तपासणी कामगार. २ वास्को किंवा हारबर येथील सरकारी डाक्टर. ३ मुरगांव जुल्गादचे सरकारी वकील. ४ मुरगांव जकात कचेरीचे डायरेक्टर. ५ मुरगांवच्या म्युनिसिपालिटीचे अध्यक्ष. ६ केच्या म्युनिसिपालीटीचे अध्यक्ष. ७ गोमंतकांतील जमीनदारांनी निवडलेला प्रतिनिधि, ८ गोमंतकांतील व्यापाऱ्यांनी निवडलेला प्रतिनिधि. कमिटीचा उपाध्यक्ष उपरोक्त पहिल्या ६ सभासदांतून नेमण्याचा अधिकर गव्हर्नरला होता. उत्पन्नाच्या बाबींत जकात वाढीतील भाग, लोकांकडून लँड आक्विझिशन अॅक्टान्वये घेतलेल्या जमिनीच्या विक्रीची किंमत, फोराचे उत्पन्न, वगैरेचा समावेश होत होता. प्रत्यक्ष कारभार कमिटीच्या अध्यक्षांकडेच असे.