पान:गोमंतक परिचय.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७३ प्रकरण दुसरे. दास कायद्यांत किंवा व्यवहारांत मुळीच आधार नाही. कडक तुरुंगव्यवस्थेत वागलेल्यांना असल्या प्रवादांची शक्यता वरील सवलतींमुळेच वाटत असावी.. कोमुनदादींची आजची स्थितिः-कोमुनदादींच्या मुळच्या सर्वाधिकारी पद्धतीपेक्षा आजचे त्यांचे स्वरूप कितीतरी बदलले आहे. न्याय, म्युनिसिपालिटी, इत्यादि स्वरूपाचे त्यांचे हक्क नष्ट होऊन आज त्यांना केवळ शेतकी संस्थांचा दजों मिळाला आहे. सरकारी दप्तरांतही त्यांना "कोमुनदादीशू आग्रीकुलश" (कृषिविषयक संस्था) हे नांव मिळत आहे. पूर्वी नवीन काबिजादीत कोमुनदादी नव्हत्या. परंतु तो प्रांत पोर्तुगीज अमलाखाली येतांच वसुलाच्या सोयीसाठी पोर्तुगीजांनी तेथे प्रजेला कोमुनदादी उत्पन्न करायला लावले व त्याप्रमाणे त्या उत्पन्नहि झाल्या. जुन्या काबिजादींतून धर्मच्छलाच्या काळी तिकडे पळून गेलेल्या गौड सारस्वत ब्राह्मण कुळकर्त्यांच्या अस्तित्वांतच याचे कारण शोधले पाहिजे. त्यांनीच त्या संस्था स्थापन करण्यास मदत केली असली पाहिजे. तूर्त साऱ्या गोमंतकांत मिळून २११ कोमुनदादी आहेत. संपन्न कोमुनदादींचें उत्पन्न ५०।६० हजार रुपयांपर्यंत असतें. ___ कुळकर्त्यांची नेमणूक द्विवार्षिक लेखी परिक्षा घेऊन पास झालेल्या उमेदवारांतून गुणांनुक्रमें करतात व ती तहाहयात असते. त्यांना वार्षिक पगार जास्तीत जास्ती सहाशे रुपयेपर्यंत असतो. कमी उत्पन्नांच्या दोन दोन तीन तीन कोमुनदादींचे गट पाडून त्यांत एकच कुळकर्णी नेमला जातो. गटांतील प्रत्येक कोमुनदादीचे दफ्तर निरनिराळेच असतें. कुळकाला आपल्या पगाराचे दोन तृतीयांश मात्र दरमहा मिळतात व बाकी एक तृतीयांश वर्षअखेर हिशेब पास झाल्यानंतरच घेतां येतो. __ खर्चवेंच जाऊन राहिलेला फायदा, कोमुनदादीच्या रचनेप्रमाणे तिच्या हक्कदारांना वाटला जातो. यासाठी, १ शेअरवाल्या कोमुनदादी, २ जणांच्या कोमुनदादी (per capita हक्कदार कुटुंबांतील पुरुष संततींत सारख्या प्रमाणानें फायद्याची वाटणी करणाऱ्या), ३ कांहीं भाग जणांवर व काही भाग शेअरवर वांटणाऱ्या कोमुनदादी व ४ फायदा तक्षिमांनी वाटणाऱ्या (per stirpe) कोमुनदादी, असे त्यांचे चार प्रकार आहेत. शेअरवाल्या कोमुनदादींचा व तक्षिमवाल्या कोमुनदादींचा हक विकत देतां घेतां येतो. व तसा तो विकत घेणाऱ्या इस.