पान:गोमंतक परिचय.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय कोमार्कात निवाडे मात्र सर्व दर्जाचे देतां येतात. आणि फौजदारी निवाड्यांत शिक्षा देण्यांत आल्यास ती हायकोर्टाने मंजूर करावी लागते. कामाच्या मानानें कोमार्कात दोन ते तीन शिरस्तेदार व ६ बेलीफ असतात. त्याचप्रमाणे शिरस्तेदारांस खटले वांटून देणे व कोर्ट फी आकारणे, या कामासाठी एक कोंतादोर दिश्त्रिबुइदोर असतो. जुल्गादांत एक शिरस्तेदार व दोन बेलीफ असतात. न्यायाचे काम सारे पोतुगीज भाषेत चालत असल्याने, मराठी व कोंकणी जाणणारा एक एक दुभाषी प्रत्येक कोर्माकांत व जुल्गादांत नेमतात. मुरगांव जल्गादांत ताबेलियांवचे काम शिरस्तेदारच करतो पण फोंडें जुल्गादांत स्वतंत्र ताबेलियांव असतो. महत्त्वाच्या बाबी:-फौजदारी कायद्यांतील महत्त्वाच्या बाबी म्हणजे खोटे दस्तऐवज करणाराला इकडे काळ्या पाण्याची शिक्षा मिळते, केवळ सक्त मजुरीने हे गुन्हेगार सुटत नाहीत; त्याचप्रमाणे माफीचा साक्षीदार हा प्राणी पोर्तुगीज कायद्यांत अजुन जन्म पावलेला नाहीं; तिसरा महत्त्वाचा फरक म्हणजे कोर्ट फी व स्टांपसंबंधी होय. एकदम सुरवातीसच कोर्ट फीची आकारणी न होतां, खटला जसजसा चालेल तसतशी होत जाते. आणि वारंवार आठ किंवा सहा आण्यांचे ( सामान्यतः फुलस्केप साइजचे) स्टांप कागद विकत घेऊन त्यावर खटला चालवावा लागल्याने, एकदम सुरवातीसच स्टांपही पण आकारला जात नाही. खटला थोडक्यांत आटपला तर या पद्धतीने कुळांचा फायदाच होतो. उलट पक्षी मात्र नुकसान होतें. आई किंवा बाप मरण पावल्यावर अज्ञानाच्या संरक्षणासाठी कोर्टामार्फत इस्टेटीची वाटणी होते तिला इव्हेंतायु ऑफानोलॉजिक म्हणतात. परंतु या पद्धतीत पुष्कळ खर्च येत असल्यामुळे बरीच कुटुंबे हलाखीस पोंचलीं आहेत. तुरुंगव्यवस्था सूडाच्या स्वरूपाची नसून सुधारणेच्या स्वरूपाची आहे. अंधारकोठडीचे, घरफोडीचे, खुनी वगैरे भयंकर कैदी सोडल्यास, बेड्यांची पादत कर मुळीच नाही. लेखनवाचनाची, घरचा पोषाख व खाणे पिणे घेण्याची, जानवें ठेवण्याची, तंबाखू ओढण्याची, रात्रौ दिवा ठेवण्याची, नातेवाईकांच्या ही देण्याची वगैरे पूर्ण मुभा असते. गरीब गुन्हेगारांना सरकारांतून कोरडा शिधा मालत असतो. पणजीच्या सेंट्रल जेलांत तर भाडे देण्याची ऐपत असल्यास कैयाला स्वतंत्र खोली देखील मिळू शकते. “बापाच्याऐवजी मुलाने किंवा एका इसमाच्या ऐवजी दुसऱ्याने शिक्षा भोगल्यास गोव्यांत चालते" या प्रवा