पान:गोमंतक परिचय.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण दुसरे. जुल्गादें ( खालची कोटें ) काढून टाकून त्या ऐवजी दुसरे लहान जुल्गाद निर्माण झाले. रिपब्लिकच्या स्थापनेनंतरः-तूर्त उपरोक्त रॅलासावांत ५ जज आहेत व एक सरकारी वकील आहे. त्याला प्रोकुरादोर द रॅपूब्लिक अशी संज्ञा आहे. हाच गव्हर्नरचा कायद्याचा सल्लागार असतो. त्याचप्रमाणे रॅलासांवांत एक सेक्रेटरी, त्याचे दोन मदतनीस, जज्जानां खटले विभागून देण्यास व कोर्ट फी आकारण्यास कोंतादोर दिस्रिबुइदोर या नांवाचा अधिकारी व दोन बेलिफ असतात. १५०० रुपयांपर्यंतच्या खटल्यांचे जे निकाल रॅलासांवांतून होतात त्यांवर पुढे अपील चालत नाही. इतर दाव्यांवर पोर्तुगालच्या सुप्रीम कोर्टातून अपील चालते. या सुप्रीम कोर्टाचा निवाडा शेवटचा असतो. ___ हायकोर्टाच्या हुकमतीखाली गोमंतक प्रांतांत तिसवाडी, बारदेश, सासष्ट, डिचोली व के अशी ५ कोटें कोमार्काची आहेत; त्यांत एक एक जज्ज असतो. सरकारी वकिलाला या कोर्टात दलगादु दु प्रोकुरादोर द रॅपुब्लिक म्हणतात. हे उभय अधिकारी पोर्तुगालच्या युनिव्हर्सिटीचे बाशारॅल (बार अॅट लॉ) असावे लागतात. अज्ञानाचे हितसंबंध, क्रिमिनल खटले चालविणे, सरकारी दिवाणी कामकाज चालविणे, सरकारच्या संरक्षणाखालच्या संस्थांचे हितसंबंध, रेजिस्ट्रेशन कचेरी, तुरुंगावरील देखरेख, ही कामें दलंगादु याने पहावयाची असतात. दस्तऐवज व मुखत्यार पत्रे लिहिणे ही का करावयाला ताबेलियांव नांवाचे दोन बिनपगारी अधिकारी (पब्लीक नोटरी ) प्रत्येक कोमार्कात असतात. दस्तऐवजाच्या लेखनासाठी सरकारी बुकें असून दस्तऐवज विषयक बाबींच्या क्रयाप्रमाणे कुळाकडून नोटरीला फी मिळते. १५० रुपयांवर क्रय असलेले दस्तऐवज खासगी व्यक्तीने लिहिण्याची कायद्यानेच मनाई आहे. तिसवाडी कोमार्कातील फोंडें कोसेल्यांत एक व सासष्ट कोमार्कातील मुरगांव कोसेल्यांत एक, अशी दोन जुल्गादें (कोमार्का खालची कोटें ) गोव्यांत आहेत. या कोर्टाना दिवाणी दाव्यांत निकाल देतां येत नसतो. सारा पुरावा मात्र घेतां येतो. व फौजदारी दाव्यांत अंतिम सीमेचे निवाडे देखील देतां येतात. परंतु त्यावर कोमार्कात अपील होऊन शिक्षा कायम व्हावी लागते. कोमार्काच्या जज्जाचा अधिकार देखील दिवाणी दाव्यांत दीडशे रुपयांपर्यंत व फौजदारी दाव्यांत १ महिन्यांची साधी कैद व ९९९ रुपये दंड इतक्यापुरता कायमचा असतो.