पान:गोमंतक परिचय.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय व कार्डाला दीड आणा असे पोस्टाचे दर आहेत. रजिस्टर पत्रांना दोन आणे जादा तिकिट लागते. पोर्तुगीज ऑफिसांतून गोव्यांतल्या गोव्यांत तार पाठवायला बारा शब्दांस आर्डिनरी आठ आणे व अर्जट १ रुपया पडतो आणि ब्रिटीश हद्दीत पाठवायचा तारेला किंवा रेल्वे स्टेशनांतून जाणाऱ्या तारेला ब्रिटीश दर लागू पडतात. तार व टपालखात्यामार्फत ज्या मनिआर्डरी येतात, त्यांचे पैसे किवा व्ही. पीचा बटवडा पोस्टमनमार्फत करण्याची वहिवाट गोव्यांत नाही. मनिऑर्डरीचे पैसे घेण्यास मालकानें कोंसेल्याच्या रेसेबेदोरीत जावे लागते व व्ही. पीचें पार्सल किंवा पत्र वगैरे मालकानेंच पोस्ट ऑफिसांत स्वतः जाऊन आणावें लागते. पोस्टल सेव्हिंग ब्यांकेला सुरुवात इ. स. १९१६ त झाली असून १९२७ साली त्यांत २३,१८,४९९ रुपये शिल्लक होते. या पब्लिकवर्क्स खातेः-या खात्याचे डायरेक्टर सिव्हिल इंजिनिअर असतात. पगार ४१२ हजार व सामान आणि बांधकामासाठी ४४० हजार एवढा खर्च दरसाल ह्या खात्याप्रीत्यर्थ होत असतो. त्यांत दोन इंजिनियर्स व ओव्हर्सीयर्स असतात. इतरत्र प्रमाणे इकडेही ह्या खात्याविरुद्ध प्रजेंत ओरड आहे. तरी पण थोडेसे अपवाद खेरीज केल्यास, रस्ते, पूल वगैरे बांधकामें बरीच समाधानकारक असतात रिपब्लिकच्या स्थापनेपासून आजवर केंपें, सांगें, सांखळी, डिचोली व भाणस्तार येथील लोखंडी पूल, पणजीचें सूतिकागृह, मडगांव व पणजीची हॉस्पिलें. इत्यादि बऱ्याच महत्वाची कामें या खात्यामार्फत झाली आहेत. तूर्त बोरीचा पल व उसगांवचा पूल ही दोन कामें चालतात. इ. स. १८७० साली बांधलेला खडेपारचा ल्याटरॉइट दगडाचा पूल याच खात्यामार्फत बांधला गेला होता, तो फारच मजबूत व प्रेक्षणीय आहे. जमीनमोजणी व शेतकीः-या उभय खात्यांची स्थापना अगदी अलीकडची आहे. त्यांपैकी जमीन मोजणी खातें इ. स. १९०३ साली स्थापन झालें असून त्याच्यामार्फत तूर्त गोमंतकाची सर्व्हे चालत आहे. ब्रिटिश हिंदुस्थानांतल्या मोजणीपेक्षां ह्या सर्व्हेची पद्धत जरा विशेष कसोशीची व पद्धतशीर असल्यामुळे मोजणीचे काम रेंगाळत चालतें. सर्व्हे नंबरांच्या नकाशावरून गांवचा नकाशा, मग कोंसेल्याचा व शेवटी गोमंतकाचा नकाशा, असा याचा क्रम आहे.