पान:गोमंतक परिचय.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण दुसरे. १८५८ साली वेंगुर्ले मार्गाने बेळगांव शहर पणजीस जोडणारी तार घालून ब्रिटिश सरकारने ती स्वतःच्याच हाती ठेविली. १८७३ साली पणजीचे ऑफीस बंद करण्याचा विचार झाला होता. परंतु पोर्तुगीज सरकारने त्याला अडथळा करून ही सोय कायम ठेवण्यासाठी ब्रिटिश सरकारला १६३८ असपर्त्यांची पँट देण्याचा करार केला. नंतर १६३८ असांऐवजी तेवढेच रुपये देण्यांत येऊ लागले. आणि १९११ सालीं, फक्त आफिसाच्या भाड्यासाठी शंभर इश्कूद म्हणजे सुमारे २५० रुपये अदांजपत्रकांत मंजूर होऊन ग्रँट बंद करण्यांत आली. यानंतर डब्ल्यु. आय. पी. रेल्वेने तारेची सोय दर स्टेशनवर केली व पणजीचें ब्रिटिश ऑफीस कुठाळ मार्गाने मुरगांवच्या रेल्वे स्टेशनला जोडण्यांत आले. के अद्याप पोर्तुगीज सरकारचे तारखातें सुरू झाले नव्हते, तें दादा राण्याच्या बंडामुळे १८९८ त सुरू होऊन पणजी, फोंडे, वाळपै व सांखळी अशी ४ ऑफिसें उघडली गेली. आरंभी तारखात्याचा कारभार पब्लिकवर्स खात्यांतून पोटखात्याच्या रूपाने चालत होता व पणजी शहरापुरती टेलिफोनची व्यवस्था १८९३ तच सुरू झाली होती, ती देखील पब्लिकवर्क्स खात्यामार्फतच चालत होती. इ. स. १९१६ सालच्या ( नं. २८४२ ता. १९ नवंबर ) कायद्याप्रमाणे तार व टेलिफोन हीं खाती टपालखात्यास जोडण्याचा ठराव होऊन १९१९ त तो अमलांत आला. दरम्यानच्या काळांत तार व टपाल आफिसांची संख्या वाढतच होती. इ. स. १९२५ साली ब्रिटिश सरकारचे पणजीतील ऑफिस पोतुगीज सरकारच्या हाती आले व दीव आणि दमण येथें तार ऑफिसे उघडण्यांत आली. तूर्त साऱ्या गोमंतकांत ७२ सरकारी पोस्ट ऑफिसें आहेत. त्यांपैकी ३४ ऑफिसांतून तारेची व्यवस्था आहे. शिवाय रेल्वे लाइनीवर एक फिरतें पोस्ट ऑफिस असते. । हिंदुस्थानांतल्या पत्रास १५ ग्रामापर्यंत अर्धा आणा व काडोस एक पैसा पडतो; वर्तमानपत्रांस गोव्यांतल्या गोव्यांत १ पै व हिंदुस्थानांत अधो पैसा; पोर्तगाल किंवा इतर पोर्तुगीज मुलखांत, पत्राला दीड आणा, काडाला पाऊण आणा व वर्तमानपत्रांस अर्धा पैसा; जगांतील इतर ठिकाणी पत्राला अडीच आण