पान:गोमंतक परिचय.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय. (तार व टपाल खातेः-टपालाच्या ने आणीस १७९८ साली सुरुवात झाली. त्यापूर्वी पोर्तुगालशी होणारा पत्रव्यवहार प्रवाशांकडून पाटविलेल्या पत्रांतून व जहाजांवरून होत असे. पोर्तुगालला पाठवावयाच्या पत्रांना चार वौताव्ह (अर्धे औंस) पर्यंत ८० रेंस (सुमारे ६ आणे) व पुढे दर पाव औंसास ४. रेंस ( सुमारे तीन आणे) पडत. मोझांबिक, मकाव, दमण व दीवला हे दर ५० रेंस (२ आणे) व २५ रेंस (आणा) असे होते. इ. स. १८२२ त ब्रिटिश सरकारशीं पोस्टल करार होऊन, गोवें, बेळगांव व मालवण यांच्या दरम्यान टपालाचे रीतसर दळणवळण सुरू झाले व १८२३ त टपाल खात्याची कायद्याने स्थापना झाली. पत्रांचे दर ब्रिटिश सरकारने आपल्या हद्दीत पत्र जेथें जावयाचे त्या ठिकाणच्या अंतराप्रमाणे कमीजास्त ठरविले होते. परंतु त्या दरांशिवाय एक रुपया भाराला अर्धी असो व पुढे प्रत्येक रुपया भारास अर्धी असर्फी, असा आणखी चार्ज पोर्तुगीज हद्दीत द्यावा लागत होता. ३६ रुपये भारावरची पत्रे घेण्यांत येत नव्हती. सन १८३८ त वेंगुर्ले येथून पत्रांची ने आण होऊ लागली आणि पोर्तुगाल व गोवें या दरम्यान आलेक्झांड्रिया मागें टपालाचा व्यवहार पद्धतशीरपणे सुरू झाला. इ. स. १८५७ त दीवचे टपाल नियमितपणे चालू झाले. प्रारंभी महिन्यांतून दोनदांच टपाल जाई. पुढ १८५९ त तीन खेपा, १८६२ त चार व १८६५ मध्ये महिन्यांतून पांच खेपा टपाल जाऊ लागले. १८६८ त ब्रिटिश हद्दीचे टपाल रोज सुरु झाले. इ. स. १८७१ त पहिल्यानेच पोस्टल स्टॅप उपयोगांत आले. मूळचे स्टांप पोर्तुगालहून छापून येत व १८७७ त ते गोव्यांतच तयार होऊ लागले. इ.स. १८७४ त बर्नच्या काँग्रेसमुळे पोर्तुगालचा समावेश जागतिक टपालसंघांत झाला व टपालाची सारीच व्यवस्था सुधारली गेली. दमणला इंग्रजी पोस्ट कचेरी होती ती १८८४ त बंद होऊन पोर्तुगीज कचेरी उघडण्यांत आली व गोव्यांतील नद्यांतून स्टीम लाँच मधून सांवडेपर्यंत टपाल दररोज जाऊ लागले. त्याच साली पार्सलांची ने आण टपाल मार्फत सुरू झाली. एक पैशाचे एक व एक आण्याचे एक अशा कार्डाची सुरुवात इ. स. १८९२ साली झाली. इ. स. १९०२ व १९१५ सालीही टपालाच्या व्यवस्थेत बरीच सुधारणा झाली व शेवटी १९२० साली पुष्कळच नवीं आफिसे उघडण्यांत येऊन बटवड्याची व्यवस्था सुधारली गेली. टेलिग्राफ व टेलिफोनः-इ. स. १८४३ सालीं सूर्यकिरणांच्या योगानें पणजी, रोज्माग, आग्वाद व काब यांमध्ये संदेश नेण्याची सुरुवात झाली. पुढे