पान:गोमंतक परिचय.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण दुसरें. दोहोंस १ या प्रमाणांत सरकार व म्युनिसिपालिटीमध्ये होऊ लागली. पुढे त्या सालापासून ही वांटणी आठांस एक या प्रमाणांत करण्याचे सरकारने ठरविले. इ. स. १८४० त जकात कचेऱ्यांची संख्या १० ऐवजी पणजी, असोळणे व कायसूव येथे बंदरी कचेऱ्या आणि सांखळी व सांगें येथें खुष्कीच्या कचेऱ्या मिळून पांचावरच आली. १८४१ त दोडोमार्ग येथेही नवी खुष्कीची कचेरी उघडण्यांत आली. ___ इ. स. १८७८ त इंग्रजी सरकारकडे अबकारीचा करार करण्यांत येऊन खुला व्यापार सुरू झाल्यामुळे, १८९२ पर्यंत जकातीची माफी होती. १८९२ साली करार संपतांच पुनः जकातीचा उगम झाला व १८९४ साली त्या खात्याचे रीतसर उद्घाटन झाले. नंतर १८९५ व १८९६ साली त्यांत थोड्या दुरुस्त्या होऊन इ. स. १९१७ साली प्रांतिक कौन्सिलाकडूनही त्यांत थोडे फेरफार झाले. आज १ पणजीची मुख्य कचेरी, २ मुरगांवची कचेरी, ३ कुळेंची कचेरी अशा तीन कचेन्या असून पणजीच्या कचेरीच्या हाताखाली दोडोमार्ग, सांखळी सांवरजून व कायसूव, अशा ४ पोटकचेऱ्या व २३ नाकी आहेत. मरगांवच्या कचेरीच्या कक्षेत, तर्पण व बेतूल या पोट कचेऱ्या असून १२ नाकी येतात. व कुळ्यांच्या कचेरीच्या हाताखाली मलें येथील पोट कचेरी असून पांच नाकी आहेत. सर्वांवर मुख्य कचेरीचा अधिकार चालतो. दमण व दीव येथील कचेया देखील पणजीच्या मुख्य कचेरीच्याच अधिकारमर्यादेत येतात. __जकातीचे स्वरूप संरक्षण पद्धतीचे असून तिचा आयातीवरील, दर १४ पासून २० टक्क्यांपर्यंत असतो. निर्गत मालावर जी जकात घेण्यांत येते, तिचे दर सामान्यतः केवळ निर्गत मालाची नोंद व्हावी एवढयाच हेतुसिद्धिपुरते असतात. कच्चा माल, उत्पादक यंत्रे, शेतकीची आऊतें, खतें यांना जकात माफ आहे. आयात जकातीची आकारणी, कांहीं मालावर नगाप्रमाणे, तर कांहीं मालावर किंमतीप्रमाणे करण्यांत येत असते. थोडेसे अपवाद गाळले तर, धातूचे जिन्नस, वस्त्रे, अन्नसामुग्री व जनावरें, यांची जकात आकारणी नगावरून किंवा वजनावरून होते व इतर कलाकौशल्याचे जिन्नस व यंत्रे यावरील जकात किंमतीवरून घेण्यांत येते. जकातीचे उत्पन्न दमण व दीवचाही समावेश केल्यास सुमारे १९ लक्ष होते.