पान:गोमंतक परिचय.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण दुसरे. गणतीप्रमाणे २१६ डॉक्टर्स व ५७ केमिस्ट धंदा करतात. ह्या सरकारी हॉस्पिटलांत दरसाल सुमारे १२०० रोग्यांना उपचार होत असतो. त्यांतून सुमारे अर्धी संख्या सरकारी नोकरांची असते. या शिवाय रायबंदर, मिझेरकोर्दी, हॉस्पिटल व मडगांवचे ओस्पीसचे हॉस्पिटल अशी दोन निराळी आहेतच. मिझेरकोर्दीच्या हॉस्पिटलांत तीन डॉक्टर, १ केमिस्ट व सोळा रुग्णपरिचारक आहेत. दरसाल सुमारे सातशे रोग्यांनां उपचार करण्यांत येतात. मडगांवच्या ओस्पीसच्या हॉस्पिटलांत सहा डाक्टर, एक केमिस्ट व तेवीस रुग्णपरिचारक आहेत. दरसाल सुमारे १००० रोग्यांना उपचार करण्यांत येतात. सामाजिक परिस्थितीचा विचार करतांना स्वच्छतेची बाब येणार असली, तरी जातां जातां येथे एक गोष्ट सांगणे आवश्यक वाटतें व ती हीच की, सामान्यतः गोव्यांतील शहरें व गांवें इतर ठिका. णच्या गांवापेक्षा कितीतरी विशेष स्वच्छ असतात. त्याचे कारणही बऱ्याच अंशी आरोग्यरक्षण खात्याच्या परिश्रमांतच आहे. - सरहद्दीवर देण्यात येणाऱ्या धुरीविषयी व तपासणीविषयी येथील सरकारावर गोमंतकांत बाहेरून येणाऱ्या प्रवाशांचा एक प्रकारचा रोष दिसून येतो. वास्तविक पाहतां या आक्षेपांत मुळीच राम नाही. एका देशांतून दुसऱ्या देशांत जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला हा त्रास सहन करावाच लागतो. राजसत्ता भिन्न असल्यामुळे इकडे तो विशेष जाणवतो. परदेशांत जाणाऱ्या प्रवाशांची आगबोटीवर चढण्यापूर्वी मुंबईत जी तपासणी होते, ती अशाच प्रकारची असते. प्लेगदूषित जागेतून येणाऱ्या इसमावर त्या तपासणीचा विशेष कटाक्ष असतो. वास्तविक धुरी दिल्याशिवाय कोणतेही सामान सरहद्दीवरून आंत जाऊ नये असा कायदा आहे. परंतु व्यवहारांत मात्र त्याची सक्त अंमलबजावणी तशाच कारणाशिवाय होत नसते. आणि त्याचमुळे प्रवाशाच्या रोषास व थट्टेस हा विषय कारणीभूत झाला असावा. जमाबंदी खाते:-पोतुगीजानी हे खातें अव्वल अमदानीत देखील इतर खात्यांपासून बरेंच स्वतंत्र ठेविले असल्याचे आपण मागे पाहिलेच आहे. इ. स. १८३५ पर्यंत या खात्याची व्यवस्थाही आपण मागे पाहिली. त्यासाली झालेल्या घटनेप्रमाणे, ज्युत द फाझेंद हे मंडळ मोडून त्या जागी कोमिसांव द फाझेंद या नांवाचें तत्सम मंडळ बनविण्यांत आले खरे, पण लागलीच १८३७ त ज्यंत द फाझेंदाचे पुनरुथ्थान झाले, त्यांत गव्हर्नर प्रेसिडेंट, हायकोर्टचे चीफ जज, प्रोकुरादोर रॅजियु, ( गव्हर्नरचे कायद्याचे सल्लागार व हायकोर्टातील सरकारी वकील) मुख्य खजीनदार आणि इश्किव्हांव द फाझेंद ( जमाबंदी खात्याचा