पान:गोमंतक परिचय.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय चिटणीस ) इतके सभासद त्या मंडळांत होते. ही व्यवस्था १८८८ सालापर्यंत चालली आणि कोंतादोरीयही त्याच साली नष्ट करण्यांत येऊन त्या ऐवजी रेपातिसांव द फाझेंद प्रोव्हिसियाल नावांचे खातें निर्माण करण्यांत आले. त्यावरील मुख्याधिकाऱ्यास इंश्पेक्तोर द फाझेंद ही संज्ञा मिळाली. खर्चाची कलमें पास करण्याचा अधिकार गव्हर्नरकडे संपविण्यांत आला. दरम्यानच्या काळांत साऱ्या गोमंतकांत जमाबंदीची एकच कचेरी गैरसोयीची असल्याचे दिसून आल्यामुळे, १८७९ सालीं, जंजिरे गोवा, बारदेश, सासष्ट, पेडणे, सांखळी, फोंडे व केंपें या कोसेल्यांतून पणजीच्या मुख्य खात्याच्या हाताखाली, “ रेपार्तिसांव द फाझेंद कोंसेल्यीय” नांवाच्या, कोंसेल्यांतील जमाबंदी पोटकचेऱ्या निर्माण करण्यांत आल्या व तीच व्यवस्था १८८३ साली सांगे व काणकोण कोंसेल्यांतून करण्यांत आली. या प्रत्येक कचेरीत एक मुख्य चिटणीस, एक खजीनदार व कामाप्रमाणे कमजास्त कारकून असतात. सासष्ट व बारदेश कोसेल्यांत काम वाढल्याचे दिसून आल्यामुळे, १८९८ साली तेथे एका कचेरीऐवजी दोन कचेऱ्या करण्यांत आल्या. पण पुढे १९०५ सालीं बारदेशची दुसरी कचेरी मोडण्यांत आली व १९०७ त सासष्ट येथेंहि दोहोंऐवजी एकच कचेरी करण्यांत आली. इ. स. १८९७ सालीं सत्तर प्रातांत जमाबंदीचें एक ठाणे ( Delegacao) उघडण्यांत आले व इ.स. १९०२ साली डिचोली येथेंहि ज्यूडीशियल खात्याच्या व लोकांच्या सोयीसाठी तसलेच ठाणे उघडले गेले. १९०७ साली ही ठाणी मोडून त्यांच्या जागीही पोटकचेऱ्याच उघडण्यांत आल्या. वरिष्ट कचेरीतही या दरम्यानच्या काळांत बरीच महत्वाची घडामोड झाली. आजवर स्वतंत्र असलेली गोव्यांतील जमाबंदीची व्यवस्था, १९०१ सालापासून पोर्तुगाल सरकारच्या हाती गेली व मुख्य खजीनदाराची जागा कमी करण्यांत येऊन खजीनदारी “ बांकु नासियोनाल उल्लामारीनु" या ब्यांकेकडे संपविण्यांत आली. अर्थातच मग मुख्य कचेरीऐवजी प्रांताचे अंदाजपत्रक इकडून जाणाऱ्या कच्च्या खरड्याप्रमाणे पोर्तुगालांत तयार होऊ लागले. व तेथील कामगारांच्या सोयीसाठी, इ. स. १९०३ पासून त्याची आकारणी रुपयाला ४०० रैस हा भाव धरून पोर्तुगालच्या नाण्यांत म्हणजे रैसांत होऊ लागली. रिपब्लिकच्या अगोदरच्या काळांत जमाबंदी खात्याचा कारभार, पणजीची मुख्य कचेरी व प्रत्येक कोंसेल्यांतील एक एक मिळून अकरा व डिचोलीची एक अशा बारा पोटकचेऱ्यांतून चालत होता.