पान:गोमंतक परिचय.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय - आरोग्यरक्षण खातेः-ह्या खात्याची रीतसर सुरवात इ. स. १८४४ त झाली इ. स. १९०४ सालाच्या सुमारास यांत जंतुविज्ञानशाळेची सोय झाली व त्यानंतर अगदी अलीकडे पृथक्करणशाळा उघडण्यांत आली. आजमितीस ह्या खात्यातर्फे पणजी येथे एक मिलिटरी हॉस्पिटल चालत असून, जंतुविज्ञान शाळा, रासायनिक पृथक्करण शाळा, सूतिकागृह या संस्था एकंदर अर्वाचिन साधनसामग्रीसह जय्यत चालत आहेत. गोव्यांतील वैद्यकीय पाठशाळा याच खात्या चालते. तिचे वर्णन पुढे शैक्षणिक परिस्थितीत येईल. प्लेगची सांथ उद्भवल्यावेळी त्याची लस टोचणे व देवी टोचणे हे गोमंतकांत सक्तीचे आहे. घरे, गांवें, विहीरी,वगैरे स्वच्छ करून देणे, सांथीच्या वेळी तत्शमनार्थ उपायांची लोकांना माहिती देणे व सांथीच्या प्रसारास हरएक उपायांनी आळा घालणे, पर मुलखांतून येणाऱ्या प्रवाशांनां तपासून संसर्गजन्य रोग नसलेल्यांनांच आंत येऊ देणे, येणाऱ्यांचें सामान धुरी देऊन स्वच्छ करणे, इत्यादि कामें या खात्यामार्फत चालत असतात व त्यासाठी प्रत्येक कोंसेल्याच्या मुख्य कचेरीच्या गांवीं एक एक असे अकरा, पणजी, कलें, रेज्माग, डिचोली व वेळ्ळी येथे प्रत्येकी एक, असे जादा पांच मिळून एकंदर १६ डाक्टर, प्रतिनिधि म्हणून ठेवले आहेत. खुद्द पणजीच्या हॉस्पिटलांत डायरेक्टरसहित सहा डॉक्टर, एक केमिस्ट व सुमारे ६० रुग्णपरिचारक असतात. सरकारी नोकरांची प्रकृति काम करण्याच्या लायकीची आहे किंवा नाही हे याच वैद्यांनी ठरवावयाचे असते. प्रारंभापासूनच आरोग्यरक्षण खात्याला प्रजेची सक्रिय मदत असल्यामुळे प्लेग, पटकी, देवी, इत्यादि सांथींचा जोर गोव्यांत फारसा किंवा मुळीच दिसून येत नाही. प्लेग वगैरे सांसर्गिक रोगांत स्थलांतर किंवा इतर उपाय सरकार करतेंच आणि त्याला प्रजेकडून कोणालाच अडथळा न येतां, परस्परांच्या सहकारित्वानें सांथीचा नायनाट लागलीच होत असतो. गोमंतकीय वैद्यकीय पाठशाळेच्या पदवीधर डॉक्टरवर्गानेही या कामी महत्वाची मदत केली आहे. इकडचे पोर्तुगीज डॉक्टर सर्जरीच्या कामी ब्रिटिश डाक्टरांइतके कुशल नाहीत, अशी एक समजूत प्रचलित आहे. प्रस्तुत लेखकाला ती विश्वसनीय वाटत नाही. औषधोपचारांत ते जगांतील कोणत्याही डॉक्टरांना हार जाणार नाहीत. विषम किंवा टायफॉइडसारख्या दूषित तापांत सांपडलेला रोगी जगणे कठीण, ही जी समजूत ब्रिटिश हिंदुस्थानांत प्रचलित आहे, तिचें गोमंतकीयांना आश्चर्यच वाटतें, इतक्या सुलभतेने असले ताप हे डाक्टर बरे करतात. तूर्त साऱ्या गोमंतकांत मिळून १९२१ च्या शिर