पान:गोमंतक परिचय.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय तार व टपाल खातें:-डायरेक्टरला सुमारे ५॥ हजार रुपये पगार मिळतो. तार, टपाल, टेलिफोन व विजेच्या कारखान्यांवरील देखरेख ही कामें यांतून चालतात. जमीन मोजणी व खनिज खातेंः-भूमापन, खाणींवरील देखरेख, नकाशा तयार करणे, वगैरे यांतून चालतात. डायरेक्टर सिव्हल इंजिनियर असून त्याला वार्षिक सुमारे ६॥ हजार रु. पगार मिळतो. रेल्वे व मुरगांव बंदरावरील देखरेखः-यावरील अधिकाऱ्यास वार्षिक सुमारे १२॥ हजार पगार मिळतो. अंतर्गत मुलकी कारभाराची व्यवस्थाः-मागे सांगितल्याप्रमाणे या कारभारासाठी जुन्या काबिजादीचे (तिसवाडी ) जंजिरे गोवा, सासष्ट, मुरगांव व बारदेश असे चार कोसेल्य आणि नव्या काबिजादीचे पेडणे, सांखळी, फोंडे, के. सांगें व काणकोण असे सात कोंसेल्य आणि सत्तरचा लष्करी विभाग, असे एकंदर अकरा विभाग पाडण्यात आले आहेत. त्यांवर आदमिनिस्वादोर नांवांचा अधिकारी गव्हर्नरने नेमलेला असतो. याची नेमणूक कमीशनच्या स्वरूपाची असन चतर्वार्षिक असते. गव्हर्नरच्या विश्वासांतील माणसांतून या जागा भरावयाच्या असल्याने, त्यांच्या नेमणुकी सामान्यतः प्रत्येक गव्हर्नरच्या बदलीप्रमाणे बदलत असतात. परंतु तसाच लवचीक धोरणाचा व कर्तबगार आदमिनिस्रादोर तीन चार गव्हर्नर देखील पाहूं शकतो. सनदी वकीलांतून किंवा पेन्शनरांतून या जागा भरावयाच्या असा कायद्याचा दंडक आहे. परंतु गव्हनेरच्या इच्छेस आलें तर सर माणसांतूनही ही नेमणूक करावयाची त्याला मुभा असते. मात्र खड्या लकी अधिकाऱ्याची नेमणूक करणे वजा आहे. आदमिनिस्वादोरांनां पगार नसतो. भत्त्यादाखल वार्षिक सुमारे चोविसरों रुपये मिळतात. शांतता व सुव्यवस्था, जंगल खात्याची व्यवस्था, धार्मिक संस्था, कोमुनदादी व इतर संस्था आणि म्यनिसिपालट्यांवरील देखरेख ही कामें यांच्याकडे असतात. सासष्ट कोसेल्य, जंजिरे गोवा व बारदेश, या कोंसेल्यांतून कोमुनदादींच्या कारभारासाठी एक व धार्मिक संस्थांच्या कारभारासाठी एक, असे दोन निराळे स्वतंत्र आदमिनिस्वादोर असल्याने तेथें आदमिनिस्वादोर दु कोसेल्यु यांचे अधिकार तेवढ्यापुरते मर्यादित असतात. आदमिनिस्वादोराच्या हाताखाली प्रत्येक फ्रेगेझींत शांतता व सुव्यवस्था राखण्याकरितां, रॅजिदोर नांवाचे बिनपगारी अधिकारी असतात. त्यांची नेमणूक आदमिनिस्वादोरच्या शिफारसीवरून गव्हर्नर करतो. कायद्याने या अधिकायांची मुदत ठरविलेली असली, तरी व्यवहारांत दहा पंधरा वर्षेहि हा अधिकार एकाच इसमाकडे राहतो. शेवटी प्रत्येक गांवांतून गांवाच्या क्षेत्राप्रमाणे व