पान:गोमंतक परिचय.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण दुसरे. राज्यव्यवस्थेची खाती:-राज्यव्यवस्थेच्या सोईसाठी खालील खात्यांतून सारा कारभार चालविला जातो. रेपार्तिसांव दु गाबिनेतिः-यांतून पोर्तुगाल सरकारशी व्यवहार, परराष्ट्रीय व्यवहार, कॉन्सलचे व्यवहार व न्यायखात्यांतील जे व्यवहार प्रांतिक सरकारमार्फत होतात, ते सर्व याच खात्यांतून चालत असतात. याच्या मुख्यास सुमारे ६८०० रु. पगार असतो. ___ लष्करी खातेंः-लष्करचा व पोलिसकोरचा सारा कारभार या खात्यामार्फत चालतो. याचा मुख्य सामान्यतः कर्नलच्या दर्जाचा असतो. व त्याला वार्षिक सुमारे १३८०० रुपये पगार असतो. __ नाविक खातें:-बंदरतपासणी व रक्षण, जलमार्गावरील नियंत्रण, मच्छिमारीवरील देखरेख, दीपगृहें, धक्के, पणजीची वेधशाळा, यांचा कारभार या खात्यांतून चालतो. याचा डायरेक्टर नाविक दळांतील ऑफिसर असून त्याला वार्षिक सुमारे १५५०० रुपये पगार असतो. ह्या तीन खात्यांवर सरकारसल्लागार मंडळाचा अधिकार चालत नसतो. अंतर्गत मुलकी व्यवस्थेचे खातें:-(पूर्वीचे सेक्रेटरिएट) यांतून शांतता व सुव्यवस्था, शिक्षण, व्यापारउदीम, कोमुनदादी, म्युनिसिपालिट्या, देवस्थाने व इतर सार्वजनिक संस्था, स्टयाटिक्स, रेजीश्त सिव्हिल (जन्ममरण व विवाह यांची नोंदणी करणारे खातें), सरकारी छापखाना व ग्याझेट, सरकारी वाचनालय, इत्यादि व्यवस्था चालते. डायरेक्टरच्या जागी बाशारेल (बार अॅट लॉ) असतो. त्याला वार्षिक दहा हजार रु. पगार असतो. __ आरोग्यरक्षण खातें:-प्रजेचे आरोग्यरक्षण व सुधराई ही या खात्यांतून चालतात. डायरेक्टर पोर्तुगालच्या युनिव्हर्सिटीची परिक्षा दिलेला असून त्याला वार्षिक सुमारे १० हजार रु. पगार मिळतो. जमाबंदी खातें:-करांची आकारणी, वसूल, खर्चाची व्यवस्था, अंदाजपत्रक तयार करणे, हिशेब राखणे व अबकारी, हे काम या खात्याकडे असते. मुख्याधिकाऱ्यास वार्षिक सुमारे ९००० रु. पगार असतो. जकात खातें:-मुख्याधिकाऱ्यास सुमारे ८ हजार वार्षिक पगार असतो. पब्लिकवर्सः-मुख्याधिकारी पोर्तुगीज युनिव्हर्सिटीचा सिव्हिल इंजिनियर असून त्याला सुमारे १४ हजार वार्षिक पगार मिळतो. शेतकी खातें:-शेतकी, जंगल व्यवस्था व पशुसंरक्षण ही या खात्यामार्फत चालतात. डायरेक्टर शेतकी इंजिनियर असून त्याला वार्षिक सुमारे ८॥ हजार रुपये पगार आहे.