पान:गोमंतक परिचय.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय .. कोसेल्यु द दिश्त्रीतुः–हें गव्हर्नरचे खास सल्लागार मंडळ आहे. त्याचा अध्यक्ष खात्यांच्या डायरेक्टरांपैकी गव्हर्नरने नेमावयाचा असतो. तिसवाडी कोमार्काचा सरकारी वकील, आरोग्य खात्याचा दुय्यम डायरेक्टर, पब्लिक वर्क्स खात्याचा दुय्यम डायरेक्टर, जमाबंदी खात्याचा दुय्यम डायरेक्टर, तिसवाडी म्युनिसीपालिटीचा अध्यक्ष, व्यापारी संस्था व उद्यमीय संस्था यांनी निवडलेला एक इसम. गोव्यांतील नागरिकांतून जास्तीत जास्त कर देणाऱ्या ६० नागरिकांनी निवडलेला एक इसम, जमीनदार व शेतकरीसंघाने निवडलेला एक इसम व सरकारसल्लागार मंडळाने निवडलेला एक इसम, असे त्यांत दहा सभासद असतात. पोर्तुगीज हिंदुस्थानास लागू करण्यांत आलेल्या कायद्यांची अम्मलबजावणी गोमांतकापुरती योग्यप्रकारे कशी करावी, या विषयीं गव्हर्नरास सल्ला देणे व सरकारी संरक्षणाखाली चाललेल्या धार्मिक, शैक्षणिक, दीनसहाय्यक संस्था, म्युनिसिपालिट्या, ग्राममंडळे इत्यादिकांचे जमाखर्च, ठराव आणि सरकारी बांधकामें व एतद्विषयक करार, यांवर निर्णायक मत देणे हे या मंडळाचे अधिकार आहेत गळ. नरचा या मंडळाशी मतविरोध झाल्यास अखेरचा निर्णय सरकारसल्लागार मंडळाच्या. खास विभागाच्या सल्ल्याने लागत असतो. । त्रिवुनाल आदमिनिस्त्रातीव्ह फिश्काल इ दश कोतशः-गव्हर्नर खेरीज करून मुलकी खात्यांतील कोणत्याही अधिकाऱ्याचे हुकूम किंवा निवाडे. कोंसेल्यु द दिस्त्रीतु, म्युनिसिपालिट्या वगैरेंतील, निवडणुका; धार्मिक शैक्षणिक दीनसहाय्यक संस्थांची कृत्ये; सरकारी कचेऱ्या व कंट्राक्टरमधील करार मदार. जकात खातें व जमाबंदी खातें यांच्या कचेऱ्यांची कृत्ये, वगैरे संबंधी लोकांकडन किंवा सरकारकडून, आलेल्या तक्रारींचा निकाल देणे व गव्हर्नरने काढलेल्या फर्मानांत खर्चाच्या बाबी असल्यास त्यांच्या कायदेशीरपणाबद्दल मत देणे, ही या मंडळाची मुख्य कामें आहेत. रॅलासांवाचे पांचही जज, गव्हर्नरने नेमलेला मुलकी खात्यांतील डायरेक्टरपैकी एक डायरेक्टर व सरकारसल्लागार मंडळाने आपल्या सभासदांपैकी निवडून दिलेला एक सभासद असे ह्याचे सात सभासद आहेत. विचारात घेतलेली बाब जमाबंदी खात्यासंबंधी असली, तर त्या खात्याचा डायरेक्टर व जकातखात्याची असली तर त्याचा डायरेक्टर हाही एक सभासद असतो. प्रोकुरादोर द रॅपूब्लिक हा या मंडळांत सरकारी हितसंबंध जपण्यास असतो. या मंडळाच्या निकालावर किंवा गव्हर्नरच्या निकालावर अपिल करावयाचे झाल्यास पोर्तुगालांत वसाहतमंडळाकडे करावे लागते.