पान:गोमंतक परिचय.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय. एकंदर वीस सभासद होते. त्याप्रमाणे निवडणुकाहि झाल्या. परंतु या मंडळाची स्थापना व्हावयाच्या दिवशींच, म्हणजे ता. १ जुलै १९१८ रोजी, सल्लागार मंडळाच्या तहकुबीचा हुकूम पोर्तुगालहून तारेनें आला. लोकांनी त्याविरुद्ध वरीच चळवळ केली. परंतु तत्कालीन गव्हर्नर पँतश रिझर यांनी चळवळीकडे लक्ष्य न देतां आपल्या मतानुसार १० सरकारी व ६ लोकनियुक्त अशा १६ सभासदांचे मंडळ बनवून ती योजना पोर्तुगाल सरकारकडून मंजूर करून घेतली. या योजने प्रमाणे झालेल्या निवडणुकांवर प्रजेने बहिष्कार घातला परंतु त्यामुळे उलट पर अप्रिय माणसें मात्र सदर मंडळांत निवडून आली. लोकांची चळवळ सारखी चालन होती तिला यश येऊन, ता. २३ मे १९१९ सालीं फ्रैंतश रिझर यांना राज्यसने बाबेल मात यांच्या हाती देऊन ताबडतोब पोर्तुगालास जाण्याचा मकस पोर्न आला. नव्या गव्हनरनी पूर्वी १९१८ च्या मार्चमधील निवडणका या त्याच कायम करून त्याप्रमाण पूवाच्या सनदेनुसार राज्यकारभार सुरवात केली. ही योजना देखील टिकली नाही. १९२० च्या नवंबरांत ह्या मंडळाची पुनटिना झाली व अध्यक्ष गव्हर्नरसह ७ सरकारी व ११ लोकनियुक्त अशा १८ सभासदांचा समावेश होऊन त्याला कोसेल्यु लेजिलातीव्ह ( कायदेमंडळ ) असें मिळाले. अर्थात् स्वायतत्तेच्या दृष्टीने ही थोडीशी वाढच झाली होती. १९२६ साली पोर्तुगालमध्ये लष्करी क्रांति होऊन सांप्रतचे लष्करी सत्तेचें धिकारी सरकार, जनरल कार्मोना यांच्या अध्यक्षतेखाली सत्ता चालवीत आहे. या सरकारने रिपब्लिकच्या मूलभूत घटनेवरच घाव घालून पोर्तुगालमधील प्रजाजन व वसाहतींतील प्रजा असा फरक केला. वसाहतींना पार्लमेंटांत प्रतिनिधि पाठविण्याचा हक्क होता तो नष्ट केला व त्या ऐवजी वसाहतीचा कारभार चालविणे ( Conselho superiar das Colonias) 'कोसेल्यु सुपेरियोर दश कोलोनियश' नांवाचे मंडळ स्थापन केले. त्यांत पोर्तुगाल सरकारने नेमलेल्या सभासदांशिवाय प्रत्येक वसाहतीने निवडलेला एक एक सभासद असे. परंतु अलीकडे हा प्रतिनिधि देखील काढून टाकून वसाहत मंडळ केवळ सरकारी सभासदांचेंच बनविलें. या पिच्छेहाटीप्रमाणेच त्यांनी प्रांतिक कायदेमंडळाचीहि छाटाछाट केली. आणि तूर्त अमलांत असलेल्या सरकार सल्लागार मंडळांत अध्यक्ष गव्हर्नर असून त्यांच्यासह पांच सरकारी अधिकारी सभासद, पांच सरकारनियुक्त बिन अधिकारी व पांच लोकनियुक्त मिळून एकंदर १५ प्रतिनिधि असतात.