पान:गोमंतक परिचय.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण दुसरे. सासष्ट बारदेश व तिसवाडी या महालांवर आदमित्रादोर नांवाचा अधिकारी राज्यकारभारासाठी होता आणि नवी काबिजादींचा सारा कारभार इतेंदेंत जराल दज् नॉव्हश कोंकिश्ताशू या अधिकाऱ्यामार्फत होई. १८६४ च्या सुमारास इंतेदेंत जरालची जागा नष्ट करून त्या ऐवजी नव्या काबिजादीचे पेडणे, सांखळी, फोंडें व के असे चार विभाग पाडून त्यांवरील अधिकाऱ्यास हे नांव देण्यात आले. आणि इ. स. १८८३ च्या सुमारास मूळचे चार विभाग कायम राखून सांगें व काणकोण हे कोंसेल्य नवे निर्माण करण्यांत आले. - रिपब्लिकची स्थापना व हक्कांतील फेरफारः-१९१० सालच्या अक्टोबर ५ रोजी पोर्तुगालांत क्रांति होऊन राजसत्ता नष्ट करण्यांत आली. तात्पुरतें मंत्रिमंडळ बनवून राज्यकारभार सुरू झाला आणि सर्वत्र निवडणुका होऊन इ. स. १९११ सालच्या आगस्ट २१ तारखेस कोंतितुइसांव द रेपूब्लिक पोर्तुगेझ. ही पोर्तुगीज रिपब्लीकची मूळभूत घटना मंजूर झाली. ह्या घटनेन्वयें पोर्तुगीज नागरिकांना जे हक्क मिळाले ते सारे कार्तकोंश्तितुसियोनाल प्रमाणेच होते. महत्वाचा असा त्यांत एकच फेरफार झाला आणि तो धार्मिक बाबतींत होय. या सनदेन्वयें सरकारने आपला स्वतःचा असा धर्म म्हणून न मानतां सर्व धर्मांची समानता स्पष्ट कबूल केली. व स्वतः रिपब्लिकसरकार धर्मापासून अलिप्त राहिले. राजकुटुंबाचे उच्चाटन व ड्युक, मार्केझ इत्यादि किताब व तदनुषंगिक अधिकार यांचा उच्छेद हे रिपब्लिकचे दुसरे महत्वाचे कार्य होते. पोर्तुगाल खेरीज इतर पोर्तुगीज मुलुखाच्या कारभारासाठी स्वतंत्र वसाहत खातें निर्माण झाले. गव्हर्नरची नेमणूक वसाहत मंत्र्याच्या शिफारसीवरून काँग्रेसुदरॅपुब्लिक मध्ये पास झाल्यानंतर पोर्तुगाल सरकार करीत होते. प्रांतिक स्वायतत्ताः-इ. स. १९१४ साली राज्यव्यवस्था व जमाखर्च या बाबतींत वसाहतींनां स्वायतत्ता दिल्याचे जाहीर झाले. यापूर्वी जमाखर्चाच्या बाबतींत गोवा सरकार पूर्णपणे पोर्तुगीज सरकारच्या आधीन होतें. ता. २७ जुलै १९१७ रोजी, वरील जाहिरनाम्यास अनुसरून, पोर्तुगीज हिंदुस्थानाला प्रांतिक स्वायत्ततेचा फायदा मिळाला. आणि त्या कायद्यान्वयें गोमंतकाचा राज्यकारभार चालविण्यास “ कोंसेल्यु दु गोव्हेर्नु” (सरकार सल्लागार मंडळ) नांवाची सभा निर्माण करण्यात आली. गव्हर्नरसाहेब हे त्या मंडळाचे अध्यक्ष असून त्यांत त्यांनी नेमलेले ९ व १० लोकनियुक्त असे