पान:गोमंतक परिचय.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण दुसरे. पोर्तुगीजांची भोंसल्याशी लढाई चालली होती तेव्हा तिच्या खर्चाच्या तरतूदीसाठी म्हणून कोमुनदादींकडून, सरकारने त्यांच्या नक्की उत्पन्नाचा एकतृतियांश लढाई चालू असे तोवर दरसाल कर्जाऊ म्हणून घेण्याचा ठराव केला. तोहि सुमारे चाळीस वर्षेपर्यंत म्हणजे सनदशीर राज्यपद्धति अमलांत येईपर्यंत, कोमुनदादींनी भरला. सनदशीर राज्यपद्धतीचे पहिलेच गव्हर्नर बेर्नार्ट पॅरिश द सील्हव यांनी तो भूर्दंड आपल्या कारकीर्दीत काढून ठाकला. परंतु तोवर ह्या जुलमी कराचें उत्पन्न ३४७५७७३ असा म्हणजे १७२७८८६ रुपये सरकारने घेतले होतें! ___ सनदशीर राज्यपद्धतिः-पोर्तुगीज राजकुटुंब फ्रेंच स्वाऱ्यांमुळे ब्राझील देशांत जाऊन राहिले होते व खुद्द पोर्तुगालांत इंग्रजी सैन्याचा तळ बरीच वर्षे जनरल बेरेस्फोर्ड याच्या हाताखाली होता. इंग्रजी सैन्याने पोर्तुगीज लोकांवर करडी सुलतानशाही गाजविली होती. त्या सर्व कारणांचा फायदा घेऊन तत्कालीन पोतुगीज तरुणांनी, इ. स. १८२० साली, क्रांतीचा झेंडा उभारला. आणि इंग्रजी सैन्यास पोर्तुगाल सोडावयास लावून जबाबदार राज्यपद्धतीचा पाया घातला. परंतु आपसांतील यादवी युद्धं बंद पडून पद्धतशीरपणे पालेमेंट भरूं लागण्यास १८३२ साल उजाडले. दरम्यानच्या काळांत सिव्हिल वार, तंटे इत्यादींस जणूं. काय भरतीच आली होती. या अंदाधुंदीच्या काळांत रीयु द जानेरु येथे भरावयाच्या पार्लमेंटांस पोर्तुगीज हिंदुस्थानतर्फे जे तीन मेंबर निवडले गेले होते, त्यांत भावी हिंदी गव्हर्नर, बेर्नार्दु पॅरिश ह सीलव्ह कोश्तासियु रॉकि द कॉश्त हे दोन हिंदी इसम व डॉ. लीम लैतांव हे युरोपियन होते. परंतु ही संडळी ब्राझील येथे पोंचण्यापूर्वीच ब्राझील देश पोर्तुगालपासून स्वतंत्र झाला होता. तेव्हां हे मेंबर तसेच लिज्बोअला गेले आणि तेथे देखील ते पोचण्याच्या आधीच दों मींगेल द ब्रागांस (राजाचे धाकटे भाऊ) यांनी सनदशीर राज्यपद्धतीला खो देऊन पार्लमेंट उधळले होते. कोंश्तासियु रॉकि दा कोइत लागलींच गोव्यांत परत आले. परंतु बनार्दु पेरिश द सील्ह हे युरोपांतच राहून पुढील यादवी युद्धांत सनदशीर राज्यपद्धतीतर्फे लढले व सन १८३४ त सारें स्थिर स्थावर होतांच पहिलेच गव्हर्नर या नात्याने गोव्यांत आले. __कार्त कोश्तितु सियोनाल पार्लमेंटांतील गोमंतकीय सभासदःज्या सनदेच्या द्वारें पोर्तुगालांत ही राज्यपद्धती अमलांत आली होती, ती राजे दों पेट्ठ, चवथे (स्वतंत्र ब्राझीलचे पहिलेच बादशहा ) यांनी प्रजेला बहाल केली होती. वर मथळ्यांत घातलेले नांव तिचेच होय. या सनदेमुळे राजसत्तेचे चार अधिकार