पान:गोमंतक परिचय.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय होतें तें कांहीं कारणासाठी पूर्वकाळी सामुदायिक उपयोगास घेण्यांत येऊन त्याच्या उत्पन्नाची भरपाई सर्व कोमुनदादी आपल्या उत्पन्नाचा एक ठराविक भाग देऊन करीत, तो हक्कही सरकारने आपणाकडे ओढून, त्याला “ गांवशीच्या काजुवा जमिनीचा कर" असें नांव दिले. ज्या कोमुनदादींतून चुडतांचा पुरवठा होत नसे, त्यांवर तारवांचे झांकण (cobrimento das naus) नांवाचा कर बसविण्यांत आला. ह्या सर्व करांचा समावेश मग फोर या एकाच नावाखाली होऊन, सरकारची जमिनीवरील मालकी शाबीत करण्यासाठी, त्यांचा उपयोग होऊ लागला. इ. स. १५१८ साली या ग्रामसंस्थांकडील जमिनींवर पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी दिझीमूश दशमभाग नांवाचा कर बसविला होता. पुढे लवकरच तो घेण्याचे बंद झाले असावें. कारण, इ. स. १७०२ साली पुनःसाऱ्या जमिनीवर मग ती कोणाच्याहि मालकीची असो, हाच कर मैयुष दिझीमूश या नांवाने शेकडा पांच टक्क्यांचा बसविण्याचा जाहीरनामा प्रजेच्या प्रमुख प्रमुख पुढाऱ्यांना बोलावून त्यांच्या समोर प्रसिद्ध केला. परंतु या कराविरुद्ध महाल पंचायतींनी ( Comaras gerais ) व पुष्कळ कोमुनदादींनी तक्रार करतांच १७०४ सालीं तो रद्द करण्यांत आला. तथापि दुसऱ्याच वर्षी ( सरकार, प्रजा व कोमुनदादी) या तीनही संस्थांच्या संयुक्त बैठकीत व्हायसरॉयनें दीझिमुशचा ठराव पास करून घेतला व त्या ठरावास अनुसरून, कोमुनदादीकडून शेकडा पांच टक्के मैयुश फोरुश घेण्यांत येऊ लागले. कोमुनदादींनी त्या विरुद्ध पुष्कळ तक्रारी केल्या. परंतु त्यांचा काडी मात्र उपयोग न होतां उलट इ. स. १७४५ त हा कर कायम राखूनहि कोमुददादी व इतर सर्व वहिवाटदार यांवर पूर्वीचाच दीझिमुश हा कर बसविण्यांत आला व त्याची आकारणी, भात शेती, नारळ, ताडी व मिठागरें, यांवर होत गेली. मात्र कोमुनदादींचे उत्पन्न कायतें शेतजमिनींतच एकवटले असून आजवर त्यांनी सरकारी खर्चाकरितां ठोकठोक अशा रकमा दिल्याचे लक्ष्यांत आणून त्यांच्या शेतांवर हा कर शेकडा पांचच टके बसविला गेला. इ. स. १७७७ साली जुन्या काबिजादींतील सर्व जमिनींच्या नक्की उत्पन्नावर शेकडा अर्धा टक्क्याचा एक कर बसविला गेला होता. करमळीचा तलाव भरून काढणे, धक्क्यांची दुरुस्ती, मोन्यांचा उपसा व शहरांतील झाडीचा नायनाट करण्याकडे त्याचे उत्पन्न खर्च व्हावयाचे होते. हा कर दहा वर्षांच्याच मुदतीचा म्हणन बसविला होता तरी पण तो अजूनहि कोमुनदादीतर्फे वसूल होत आहे.