पान:गोमंतक परिचय.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण दुसरे. पाखंडी असें नांव मिळाले होतें, युरोपियन वर्ग हा जेत्यांचाच वर्ग असल्यामुळे, त्यांची परिस्थिति सर्वतोपरी उत्तमच असे. त्याच्या खालोखाल लूझोइंडियन वर्गाला, सरकारी अधिकार वगैरे मिळत असत. आणि इतर दोन वर्गांना युरोपियन तुच्छतेनेच वागवीत असत. त्यांतल्या त्यांत एतद्देशीय ख्रिस्त्यांना प्रारंभापासूनच शिक्षण मिळाल्यामुळे खालच्या सरकारी जागा, धर्मखात्यांतील जागा वगैरे त्यांना सहज मिळत. गुलामगिरीची पद्धत सर्रास चालूच होती. बिचाऱ्या हिंदु लोकांना सरकारी दफ्तरांत अस्तित्वच नव्हते. वर्णभेद तर १७७४ पर्यंत युरोपियनांकडून कडकपणे पाळला जात असे. त्यांच्या दृष्टीने हिंदु लोक हे मानवी प्राणीच नव्हते म्हटले तरी चालेल. ही दृष्टी त्यांना जेसुइट लोकांच्या वर्तणुकीमुळे व प्राबल्यामुळे प्राप्त झाली होती. खास युरोप मधून आलेले युरोपियन रैनॉइश यांचा एक वर्ग व काश्तीस मिश्तीस व कानारी यांचा दुसरा, असे दोनच वर्ग पूर्वी सरकारी नेमणुकांतून वगैरे राज्यकर्ते पाळीत असत. १७७४ साली मार्केझ द पोंबालने या वर्णभेदास मूठमाती दिली व हिंदुलोकांशिवाय इतर सर्व वर्गांचा दर्जा कायद्याने समान ठरवून तो न पाळणारांस कडक शिक्षा ठरविल्या. फार तर काय पण निग्रो, मिश्तीस इत्यादि अपमानास्पद विशेषणे हिंदी ख्रिस्ती प्रजेला देणे हादेखील कडक शिक्षेस कारणीभूत होणारा गुन्हा ठरविला गेला. न्यायखातें, लष्करी खातें, किंवा इतर कोणत्याच खात्यांत . अथवा नैसर्गिक हक्काने प्रजेला जे अधिकार प्राप्त होतात, त्यांत साऱ्या ख्रिस्त्यांचा दर्जा समान ठरवून जित व जेते हा भेद त्याने गाडून टाकला. ह्या धोरणाचा भरपूर फायदा आमच्या ख्रिस्ती बंधूंनी घेतला. सनदशीर राज्यपद्धति गोमंतकांत चालू करावयाचा मान हिंदी इसमाला याच धोरणामुळे मिळाला. - करपद्धतिः-गोमंतकांतील ग्रामसंस्थांनी पूर्वकालीन कदंबादि राज्यकर्त्यांकडे जे करार केले होते, त्यांत प्रत्येक गांवानें खुषीनें स्वीकारलेल्या कराला खुशीव्रत हे नांव मिळाले होते. पोर्तुगीज अमलांत ह्या पूर्वीच्या कराशिवाय दुसरा कर सरकार मागणार नाही असा कौल मिळाला असतांही, इ. स. १५३३ त घोडेव्रत नांवाचा दुसरा कर पोर्तुगीजांनी प्रजेवर लादला. या करांतून स्वारांच्या पथकांचा खर्च चालावयाचा असे. ह्या खेरीज गवत, तांदूळ, लव्हाळे, चुडतें इत्यादींची मागणी दरसाल जरूरीप्रमाणे होई ती निराळीच. इ. स. १५३९ त कुळकर्णांच्या वतनी जमिनीवर कुळकर्ण पापोशी नांवचा कर बसविण्यांत आला. गांवशी नांवाचें एक खाजन (खारी जिरायती जमीन ) त्याच नांवच्या कोमुनदादीचे