पान:गोमंतक परिचय.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय da fazenda ) हे नांव मिळाले. या नव्या योजनेप्रमाणे बनलेल्या कौन्सिलांत अध्यक्ष, व्हायसरॉय व्हॅदोर जॅराल द फाझेंद, प्रोकुरादोर जराल द कुरेय द फाझेंद (गव्हर्नरचे कायद्याचे सल्लागार व हायकोर्टातील सरकारी वकील ) असे सभासद असत. शिवाय मुख्य खजिनदार व मुळच्या कौन्सिलचा चिटणीस यांनाहि या कौन्सिलांत बसण्याचा हक्क होता. इ. स. १७७४ सालीं, व्हॅदोर द फाझेंद हा हुद्दा काढून टाकण्यात आला व बाकीच्याच सभासदांचे कौन्सिल राहिले. ही योजना सन १८३५ पर्यंत राहिली. मध्यंतरी १८१९ त जुन्या गोव्यांतून राजधानी पणजी येथे नेण्यांत आली तेव्हां ह्या कौन्सिलाच्या सभाहि पणजीतच भरूं लागल्या. सांप्रतच्या जमाबंदी कचेरीचा उगमः-वर सांगितलेल्या १७६९ च्याच सालीं इश्किव्हांव द ज्युत हा नवा हुद्दा निर्माण करण्यांत आला व त्याला खजिन्याच्या चिटणिसीचे काम नेमून दिले होते. हाच तूर्तच्या जमाबंदी खात्याचा मुख्य अधिकाऱ्याचा कायदेशीर पूर्वज होय. शिवाय एक कोंतादोर, (हिशेबनवीस व त्याच्या हाताखाली चार ऑफिसर नेमून त्यांचे कोंतादारीय जराल नांवाचें ऑफिसहि याच कायद्यान्वयें स्थापले गेले होते. प्रारंभी या ऑफिसाकडे एकंदर आवक जावक हिशेवाची तपासणी व लेखन हे काम संपविले होते. पुढे त्याचे अधिकार उत्तरोत्तर वाढत जाऊन त्यांतूनच तूर्तच्या जमाबंदी कचेरीचा उद्भव झाला. प्रजेची स्थितिः-एवढया ह्या टप्प्यावर पोंचतांच, ह्या कालविभागांत प्रजेला काय काय हक होते, त्यांचा थोडासा विचार करणे आवश्यक असल्यामुळे, तेवढा करून आपण सनदशीर राज्यपद्धतीकडे वळू. या कालविभागांत प्रजा चार वर्गात वाटली गेली होती. खास युरोपमधून आलेले अधिकारी, पाद्री इत्यादि लोक यांना रैनाइश म्हणत असत. व स्थायिक बनलेल्या युरोपियनांचे वंशज (ह्यांना काश्तीस म्हणजे जातिवंत अशी संज्ञा रूढ झाली होती ) एतद्देशीय मसलमानी व हिंदु स्त्रियांशी झालेल्या युरोपियनांच्या विवाहांपासून झालेली संतति ( ह्यांना मिश्तीस म्हणजे मिश्र अशी संज्ञा रूढ होती ); प्रस्तुत ग्रंथांत आम्ही त्यांना लूझोइंडियन हे नांव योजिले आहे. धर्मांतरित होऊन ख्रिस्ती सोले हिंदी लोक ( ह्यांना कानारी म्हणजे कानडी अशी संज्ञा होती; ) व शेवटी अद्याप चिकाटीने गोव्यांत राहिलेले हिंदुधर्मीय ( यांना जेंतीयु gentio म्हणजे