पान:गोमंतक परिचय.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तीन महिन्यांच्या अवकाशांत, रोजची इतर कर्तव्ये सांभाळून हे पुस्तक पुरे करावें लागलें. अर्थात् यांत पुष्कळ उणीवा आहेत हे लेखक जाणूनच आहे. पण त्यास त्याचा नाइलाज आहे. लेखन व प्रकाशन या कामी ज्या अनेक मित्रांची मदत झाली त्यांचे आभार मानायला योग्य असे शब्द लेखकाकडे नाहीत. विशेषतः श्री. यशवंतराव सू. सरदेसाई, श्री. दत्तात्रय व्यं. पै, श्री. गणपतराव वि. लाड, डॉ. व्यंकटेश यांडरंग कामत, प्रो. रामचंद्र शंकर नायक, श्री. विठ्ठल सदाशिव सुखठणकर, श्री. शिवा फट पै आंगले, श्री. मुकुंद सदाशिव शेळकर, इत्यादि मित्रांनी जी बहुमोल मदत केली व जिच्या अभावी हे कार्य मुळीच शक्य झाले नसते, तिचा उल्लेख न केल्यास अक्षम्य दोषाचा भार शिरावर घ्यावा लागेल; आणि म्हणूनच उपरोक्त मित्रांच्या शालीनतापूर्ण विरोधास न जुमानतां तो करण्यांत येत आहे. साधनांची जुळवाजुळव करून वारंवार हस्तलिखितांची तपासणी करण्याचे महत्वाचे कार्य श्री. सरदेसाई यांनी केले, तर लेखकाला अज्ञात अशी पुष्कळशी नवी माहिती देणे व मुद्रितें तपासण्याचे अत्यंत जरूरीचे काम श्री. लाड यांनी न कंटाळतां व आपला अमूल्य वेळ खर्चुन केलें; श्री. रामचंद्र नायक यांनी गोमंतकाचा नकाशा तयार करून दिला व श्री. सुखठणकर यांनी वै. बहुगुण कामत वाघ यांची जुना पोषाख दाखविणारी ऐतिहासिक तसबीर दिली. अर्थात् पुस्तक तयार होण्याचे बरेचसे श्रेय या मित्रवर्गाचंच आहे. लेखक केवळ निमित्तमात्रच आहे. - सांव-गोवा. ). चै. वद्य ७ मी शके १८५२ । ता. २० एप्रिल १९३० ) बाळकृष्ण वामन सावर्डेकर.