पान:गोमंतक परिचय.pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

lige गतादाखल. आमचा गोमंतक प्रांत शेकडों वर्षे फिरंगीसत्तेमुळे महाराष्ट्रापासून सांस्कृतिक दृष्टयादेखील तुटक समजला जात असून, राज्यकर्त्यांच्या भाषेमुळे, जुन्या काळी झालेल्या धर्मांतराच्या कहरामुळे व इतरहि अनेक कारणांमुळे, आम्हांविषयीं व आमच्या प्रांताविषयी असावी तशी माहिती असलेली दिसून येत नाही. _ म्हणून गोमंतकाबाहेरच्या हिंदुबांधवांना-विशेषतः महाराष्ट्रीयांना-गोमंतकाची खरीखुरी ओळख करून देतां आल्यास पहावी, एवढ्याचसाठी प्रस्तुत पुस्तकाचा जन्म होत आहे. येतें महाराष्ट्र साहित्यसम्मेलन भरण्यापूर्वीच ते तयार व्हावें अशा हेतूनें लेखकाने ते हाती घेतले. कामास सुरुवात केल्यावर खुद्द गोमंतकीयांना आपल्या प्रांताविषयी असावी तशी माहिती नाही, ही जी समजूत पूर्वी होती तिला दुजोरा मिळाला. कारण, सरकारी असो किंवा खासगी असो, पण आजकालच्या शिक्षणसंस्थांतून देखील गोमंतकाच्या पूर्वापार इतिहासाचे शिक्षण मिळण्याची मुळीच सोय नाही. अर्थात् वृद्ध मंडळीच्या तोंडून एखादे वेळी दंतकथात्मक अशी जी तुटपुंजी हकीकत निघत असे, तिजवरच गोमंतकीय हिंदूंची आजवर सारी भिस्त होती. तेव्हां जिज्ञासू गोमंतकीयांना देखील आपल्या प्रांताची सारी माहिती संकलित रूपाने प्रस्तुत पुस्तकांतच देतां आल्यास पहावी असा विचार मनांत आला. हे पुस्तक केवळ इतिहासात्मक नव्हे हे वाचकांच्या लक्ष्यांत येईलच. कारण इतिहास म्हणजे समाजांतील घडामोडींचें कार्यकारणभावासहित दिलेलें वर्णन होय, अशी जी एक खरीखोटी समजूत आजला प्रचलित आहे, तिच्या चौकटींत हे बसत नाही. तसें तें बसावयाला आणखीहि कित्येक घडामोडींचा यांत उल्लेख होणे आवश्यक होते आणि आलेल्या बऱ्याच मजकुराला काट दिला पाहिजे होता. . पण महत्वाचे व सांगण्यासारखें जें मनांत आलें तें येथे सांगितले असल्यामुळे यांतील लेखन कथनात्मक स्वरूपाचे झाले आहे. येत्या महाराष्ट्र साहित्यसंमेलनापूर्वी पुस्तक तयार करण्याचे कालविषयक बंधन असल्यामुळे सर्व बाजूंनी विचार करण्यास व इतर अनेक साधनांची जुळवाजुळव करण्यास सवड नव्हती. केवळ