पान:गोमंतक परिचय.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय ३८ आठ अव्वल कोटें चालत होती. शिवाय मोझांबिक, मकाव व तिमोरच्या वसाहतींतील अव्वल कोटेंहि याच रॅलासांवाच्या हातांखाली चालत असत. रॅलासांवांतील न्यायसभेचे अध्यक्षस्थान गव्हर्नर साहेबांकडे दिले गेले होते. न्यायपद्धतिः-तिसवाडींतील कोमुनदादीतर्फे चालणाऱ्या, अंतर्गत दिवाणी दाव्यांच्या किंवा त्यांनी आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांविरुद्ध दिलेल्या निकालांचें अपील चालविणाऱ्या न्यायकोर्टाची रचना जरा निराळीच होती. तींत गव्हर्नर साहेबांच्या अध्यक्षतेखाली आर्चबिशप व हायकोर्टाचे दोन जज हे न्याय देत असत. जुन्या काबिजादींतील इतर न्याय वर सांगितलेली अव्वल कोटें करीत असत. __नव्या काबिजादींतील दिवाणी व फौजदारी न्यायाधिकार वर सांगितल्याप्रमाणे तेथील मुख्य मुलकी अंमलदाराकडेच संपविले होते. दिवाणी दावे पंचायत नेमून आर्बिट्रेशन पद्धतीने लवादांकडून तोडण्यांत येत. या लवादांना जसा व्यवहाराचा ( facto) तसाच कायदा लागू करण्याचा ( direito) असे उभय अधिकार असत. इतेंदेंत (मुख्य अधिकारी) याने हजर रहायचे व निवाड्याची अंमलबजावणी तेवढी करावयाची होती. या दिवाणी दाव्यांचे अपील गव्हर्नरकडे चालत असे. फौजदारी कज्जांत आरोप लागू होतांच (formada a culpa) कोमनदादींच्या वरिष्ठ मंडळाकडे म्हणजे कामर जराल द प्रोव्हीसिय ( Camara geral da Provincia) कडे खटला निवाड्याकडे जाई. देहांत शिक्षा देण्याचा (ती कायदेशीरपणे देत येई तेव्हां ) अधिकार देखील या सभेला असे. मात्र ह्या सभेचे निवाडे कायम होण्यासाठी हायकोर्टात त्यांना मंजुरी मिळावी लागे. दिलेला निवाडा फिरविण्याचा अधिकारहि हायकोर्टाला होता. कायदेः-जुन्या काबिजादीतील न्यायदान, इतर बाबतींत पोर्तुगालच्या तत्कालीन कायद्याप्रमाणे चालत होते; दिवाणी खटले Livro 4° das ordenacoes do reino या कायद्याप्रमाणे चालत व फौजदारी खटले Ordenacles Filipinas या कायद्याप्रमाणे चालत. कोमुदादींतील खटले त्यांना दिलेल्या १५२६ सालच्या सनदेप्रमाणे चालत. ही सनद म्हणजे त्यांचे फौजदारी, मुलकी, जमाबंदी इत्यादि कायदेच होते. १७३५ साली या कायद्यांना व्हायसरॉय कोदं द सांदोमिल यांनी आणखी काही नवे जोडले होते. आणि नव्या काबिजादीतील न्यायदान त्यांच्या स्वतंत्र कानूं