पान:गोमंतक परिचय.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण दुसरे. अधिकारी नेसून त्याच्याद्वारे करण्याचा रिवाज पडला. नवीन काबिजादींचा कारभार इंतेंदेंसिय जराल दश नोव्हश कोंकीशताश ( Intendencia geral das Novas Conquistas) नांवाच्या ठाण्यांतून चालत असे. गोमंतकांतील लष्करावर कमांडर इन चीफ या नात्याने गव्हर्नरचाच अधिकार चालत असे. ____न्याय खातेः-अव्वल पोर्तुगीज अमलांत देखील न्याय खात्याची व्यवस्था काहींशी स्वतंत्रच होती. इ. स. १५४४ त गोव्यांचे हायकोर्ट स्थापन करण्यांत आले व त्यांत तीन जज्ज नेमण्यांत आले. त्यांचे अधिकार प्रारंभी कांहीसे स्वतंत्र तर कांहींसे मुलकी कारभाराशी संलग्न अशा मिश्र स्वरूपाचे असत. तरी देखील धार्मिक जुलमाच्या काळी या मिश्र स्वरूपाच्याच न्यायाधिकाऱ्यांनी ख्रिस्तीकरणांतील जुलुमांविरुद्ध लोटलीच्या देवालयाच्या प्रकरणासारख्या खटल्यांत हिंदूंनां न्याय दिला होता. असें जुलुमांच्या जंत्रीत दिसून येते. न्यायाधीशांनां “ दिझेंबागादोर" (Desembargador ) ही संज्ञा होती. हायकोर्टातील एक दिझेंबार्गादोर, प्रोकुरादोर जराल द कोरोअ इ फाझेंद या संज्ञेखाली सरकारी वकीलाचें काम चालवीत असे. इ. स. १६१७ साली ही संख्या चौदापर्यंत वाढविली गेली. इ. स. १७७४ साली मार्केझ द पोंबाल यांनी हायकोर्ट काढून टाकून त्याच्याऐवजी तो अधिकार ओव्हिदोर जराल नावाच्या एकाच जज्जाकडे दिला. परंतु ही व्यवस्था मार्केझ द पोंबालच्या मागे १७७६ तच बदलली व पूर्वीप्रमाणेच हायकोर्ट स्थापण्यांत येऊन त्यांत चार जज्ज व एक मोर्तबगार अशा पांच अधिकाऱ्याची योजना झाली. इ. स. १८२६ त पोर्तुगालच्या क्रांतीतून उद्भवलेल्या गडबडीत हायकोर्टाच्या जागी junta de justica ज्युत द ज्युश्तीस नांवाच्या मंडळाची योजना झाली होती. परंतु पुढे दहाच वर्षांनी सनदशीर राज्यपद्धतीचे गोव्यांत आगमन होतांच, न्याय खात्याला आजचे स्वरूप प्राप्त होऊन तें. अंमलबजावणी खात्यापासून पूर्णपणे स्वतंत्र झाले. - रॅलासांव द गोअ ( गोव्याचे हायकोर्ट ) ह्याच्याखाली प्रारंभी (१) मृतव्यक्ति, अनाथ, चर्चे, तंबाखू इत्यादींचा न्याय तोडणाऱ्या न्यायाधिशाचे दिवाणी व फौजदारी अधिकार असलेले कोर्ट, (२) सासष्ट, वारदेश व तिसवाडी महालांतून आणि दमण व दीव प्रांतांतून उभय प्रकारच्या अधिकारांचे प्रत्येकी एक एक कोर्ट, (३) जुन्या काविजादीतील कोमुनदादींच्या महालांचे प्रत्येकी एक कोर्ट व 1) नव्या काबिजादींतील इतेंदेंत जराल दश नोव्हशू कोंकीश्तशू हा, मुलकी व न्याय या उभय सत्तेने मंडित अशा अधिकाऱ्याचे एक कोर्ट, अशी एकंदर