पान:गोमंतक परिचय.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय समायिक मालकीची जिराइत जमिनीची लागण, काही ठिकाणी चिठ्यांनी कांहीं ठिकाणी पाळीने तर काही ठिकाणी हक्कदारांतच लिलाव होऊन मक्त्याने होई. आणि कोमुनदादीचा सारा खर्चवेंच जाऊन राहिलेल्या फायद्याची किंवा येणाऱ्या तुटीची गांवकऱ्यांत वांटणी होई. काही ठिकाणी ही वांटणी तांगें, असा नांवाच्या शेअर्सच्या पायावर, कांही ठिकाणी गांवकरांत पुरुषवर्गाच्या संख्येने भागून तर काही ठिकाणी तक्षिमांनी म्हणजे वांट्यांनी विभागला जाई. गांवचे दप्तर कुळकर्यांकडेच असे व हे कुळकर्णी देखील वतनदार असत. दरसाल प्रत्येक गावांत मक्त्याने वसुलदार नेमण्यांत येई त्याजकडून सारा वसूल होई. त्या कोमुनदादीचा महालचा कारभार देखील असाच प्रजासत्ताक पद्धतीने चाले. प्रत्येक गांवांतून महाल कमीटींत बसण्याकरतां एक एक मुखत्यार निवडला जाई व त्यांच्या सभेमार्फत महालचा कारभार चाले. सरकार देण्याची रक्कम प्रत्येक कोमुनदादीने याच मंडळाकडे भरावयाची असे. त्यामुळे सरकारला वसुलाच्या बाबतीत हे मंडळच जवाबदार असे. महालचें दप्तरहि नाडकर्णी नांवाच्या हुद्देदाराकडे असे. महालच्या खर्चासाठी प्रत्येक कोमुनदादीवर तिच्या मगदुराप्रमाणे कर वांटला जात असे. महाल कमिट्यांना पोर्तुगीज अमदानीत “ काम्र जराल दे प्रोव्हीसिय-" (Gamara geral de provincia ) अशी संज्ञा मिळाली होती. अशा ह्या नमुनेदार कारभारामुळे राज्यकर्त्यांची कामगिरी पुष्कळच सुलभ झाली होती. पोर्तुगीजांनी ह्या संस्था नष्ट न करतां तशाच जतन करून ठेवल्या खऱ्या, परंतु त्यांत त्यांनी जे फेरफार वेळोवेळ केले, त्यामुळे त्यांचे मूळचें राजकीय, सामाजिक व धार्मिक स्वरूप पार बदलून जाऊन, आतांशा त्यांना केवळ व्यापारी स्वरूपाच्या कृषिविषयक कंपन्यांचा आकार प्राप्त झाला आहे. तूर्ताचा त्यांचा कारभार कसा चालतो ते याच प्रकरणात १० सांगण्यांत येईल. मुलकी कारभारः-वर सांगितलेल्या कोमुनदादींच्या माहितीवरून अवल पोर्तुगीजशाहीत मुलकी कारभार राज्यकर्त्यांनां फारसा भानगडीचा झाला नाही. व्हायसरॉय किंवा गव्हरनरच्या हाताखाली सेक्रेटरीएट खात्यांतूनच सारा मुलका कारभार प्रारंभी चाले. व्हायसरॉयच्या गैरहजीरींत आर्चबीशप, सेक्रेटरी व हायका टंचे चीफजज्ज यांचे कौन्सिल गोव्याचा राज्यकारभार चालवीत असे. प्रारभा प्रारंभी सारा राज्यकारभार उपरिनिर्दिष्ट काम्र आग्रार्यच्या हातून चालविण्यांत येई परंतु मागाहून जुन्या काबिजादींतून प्रत्येक महालावर आदमिनिस्वादोर नावाचा