पान:गोमंतक परिचय.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण दुसरे. ९ रणबेट,) दिवाडी ( दीपवती) व जुवें ह्या बेटांतील ग्रामसंस्थांकडून १८ हजार रुप्याची तांगें म्हणजे २४०० रुपये मिळत. सासष्ट प्रांतांतून २७३९३ असर्फी रसद नाणे (१२८५२। रुपये) व वारदेश प्रांतांतून २८८७१ असर्फी ( १३६८३॥. रुपये ) सरकारदेणे मिळत होते. पुढे पोर्तुगीजांची सत्ता दृढमूळ होतांच त्यांनी कोमुनदादींवर वेळोवेळ हरत-हेचे जुलुमी कर बसविले खरे, परंतु त्यांच्या कारभाराची घडी फारसी विसकटून टाकली नव्हती. शेवटी. इ. स.१७७७ साली मार्केझ द पोंबालच्या आज्ञेवरून जे नवीन करार केले त्यांस अनुसरून, तिसवाडी प्रांत १५८८३=२=३१ असा (सुमारे ७९४१॥ रुपये.) सासष्ट प्रांत ८६१४९=३=१६ असपा ( ४३०४७॥6 ) व बारदेश प्रांत ३१५८=२=२३ असा ( म्हणजे १५७९०४७.) एवढे देणे कोमुनदादीनां द्यावे लागत असे. कोमुनदादींतील पूर्वकालीन कारभार साधारणपणे एखाद्या महाजन सत्ताक रिपब्लिकप्रमाणेच चालत होता. गांवांतील एकंदर जमिनीवर कोमुनदादीचीच मालकी होती, व ह्या मालकीबद्दल किंवा वहिवाटीबद्दल, येईल त्या सरकारला, त्यांजकडून ठराविक देणे मिळत असे. गांवांतील जमिनीच्या उत्तम व कनिष्ट अशा दोन प्रती पाडल्या होत्या. उत्तम जमिनीचा एक भाग त्यांनी कोमुनदादीच्या सेवकजनांसाठी तोडून दिला होता. दुसरा भाग देवालये व त्यांतील, भट, गायिका, वाजंत्री, भाविणी, इत्यादिकांच्या उपजीविकेसाठी राखून तिसरा भाग संस्थेच्या फंडास राखला. ही उत्तम प्रतीची जमीन म्हणजे केवळ जिराइती होती. दुसऱ्या प्रतीची जमीन देखील तीन वांट्यांनी विभागून पूर्ववत् कांही भाग देवालयादिकांना सोडला. दुसरा विभाग, रस्ते, कुरणे, तलाव, कालवे, विहिरी, गुरांच्या वाटा, स्मशान इत्यादि सार्वजनिक उपयोगाच्या कामांसाठी राखून ठेविला होता. आणि तिसऱ्या विभागांतून कांहीं जमीन कुटुंबण या नावाने कायम धान्याने खंडास लाविल्या व कांहीं कुळागर, घरमांड, घरभाट, इत्यादि नांवाखाली आपसांतच वांटून घेऊन त्यांवर कमीजास्त होणारा कर कांही ठराविक विभाज्य पद्धतीने बसविला. गांवचा न्यायमनसुबाही गांवकऱ्यांतच तुटत असे. खासगी मालकीच्या जमिनी अशा पूर्वी फारशा नव्हत्या हे एक कारण व दुसरें आकुंचित क्षेत्रांतच न्यायाची पाळी आल्यामुळे आतांच्या प्रमाणे खोटे साक्षीदार अजून जन्म पावावयाचे होते हे दुसरें, अशा कारणामुळे न्यायहि बराच सोपा होता. कोमुनदादीचा सारा कारभार गांवक-यांच्या सभा भरून त्यांतील ठरावान्वयें चाले. या सभांतील ठराव एक मतानेंच व्हावे लागत, हा त्यांत विशेष होता.