पान:गोमंतक परिचय.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय ठेवला गेला आहे, हे प्रारंभीच सांगणे भाग आहे. इ. स. १८३५ पर्यंत गोव्याचा राज्यकारभार पोर्तुगीज सरकारकडून, व्हायसरॉय व त्यांचे सेक्रेटरी यांचे मार्फत एकतंत्री व एकमुखीच चालत असे. जमाबंदी खातें व न्यायखातें हीच कायती दोन खातीं कांहींशी स्वतंत्र होती. राज्यकारभाराच्या सोयीसाठी सोळाव्या शतकांत सबंध गोवाप्रांत पोर्तुगीज सरकारच्या ताव्यांत अजून आला नव्हता. केवळ सासष्ट बारदेश व तिसवाडी ऊर्फ गोवाबेटासह इतर बेटे, असे तीनच प्रांत होते. गोमांतकांतील त्यावेळचा राज्यकारभार हा धर्मप्रसाराच्याच दृष्टीने विशेषतः चालविला जात असल्याने, त्या काळी साहजिकच राज्यकारभारांत बिशप, धर्मसमीक्षण सभा ऊर्फ इंक्विझीशन व जेजुईटादि धार्मिक संस्थांचे प्राबल्य चालत होते. पोर्तुगीजांना राज्यकारभार सुलभपणे चालविण्यास कोमुनदादी ऊर्फ ग्रामसंस्थांची गोमांतकांतील भरभराटींत आलेली संस्थाच पुष्कळशी कारणीभूत झाली असल्यामुळे ह्या कोमुनदादीची कांहींशी माहिती करून देणे अवश्य आहे. सनदादी ऊर्फ ग्रामसंस्था-इकडे येतांनाच पोर्तुगीजांनां सर्वांत नवाईची जी गोष्ट दिसली ती म्हणजे ह्या कोमुनदादी होत. ग्रामसंस्थांचे वर्णन सर हेन्री मेन यांनी आपल्या “ व्हिलेज कम्युनिटीज" या ग्रंथांत सांगोपांग नसलें तरी बरेंच पूर्णपणे केले आहे. प्रसिद्ध गोमंतकीय ख्रिस्ती लेखक फिलीफ नरी शाव्हियर यांनी गोमांतकांतील ग्रामसंस्थांचे वर्णन आपल्या बोल्केज इश्तोरिक दश कोमुनिदादीज द गोआ ( Bosquejo Historico Dos Comunidades de Goa) ह्या ग्रंथांत सविस्तर व मार्मिकपणे केले आहे. यरोपांत अशा प्रकारच्या संस्था होत्या खऱ्या; परंतु धामधुमीत जन्म पावलेल्या व सामान्यतः आजन्म लुटालूट व चांचेगिरीतच वावरणाऱ्या नवजात पोर्तुगीज राष्ट्रामध्ये त्यांची माहिती देखील नसल्यास त्यांत नवल नाही. गोवेंशहर व त्याच्या सभोंवतालचा प्रांत हस्तगत करतांच आल्बुकेर्कने ह्या संस्थांकडून आदिलशहाला मिळत असलेल्या करांपैकी एक तृतीयांश त्यांनां माफ केला व पोर्तुगीज सरकारतर्फे ग्रामसंस्थांनां आपापल्या साऱ्या चालीरीति बिनधोक चालविण्याची हमी देऊन कौल दिला. ( Bosqu. His. Vol. I, pg. 192) पुढे गोवा प्रांत परत लागलीच आदिलशाही अमलामध्ये जातांच हा कौल निरुपयोगी ठरला. नंतर १५१० नवंबरांत गोवें शहर आल्बुकेर्कनें परत घेतांच ग्रामसंस्थांच्या गांवकरांकडे परत करार केला, तेव्हां गोवाबेट, चोडण (चूडाम