पान:गोमंतक परिचय.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण दुसरे. आश्रयास आलेल्या लढाऊ लोकांना आपल्या स्वाधीन करणे हे आंतर्राष्ट्रीय कायद्यास अनुसरून नसल्यावरून तसे केल्यास पोर्तुगालच्या इभ्रतीस धोका येईल, तेव्हां हे कृत्य आपण करायला मुळीच कबूल नाही. आतां त्यांना न्यायचेच असल्यास आपल्या तोफांच्या सहाय्याने आपण तें कृत्य सहज करूं शकाल. परंतु त्यांच्या केसास धक्का लागण्यापूर्वी, गोव्यांतील पोर्तुगीज म्हणविणाऱ्या साऱ्या इसमांसही कैद करणे आपल्याला भाग पडेल व तसे झाल्यास पहिला कैदी होण्याचा मान मीच घेईन " असा रोखठोक जवाब दिला. ऑर्थर साहेब आले तसेच परत गेले. कारण पोर्तुगीज लोकांवर हल्ला करण्याइतकी शक्ति असली तरी हिंदुस्थानांतील तत्कालीन परिस्थितीमुळे किंवा युरोपियन राजकारणामुळे असो, त्यांना तेवढा हिय्या मात्र झाला नाही. पुढे वाडीहून पोलिटिकल एजंट जेकब साहेब जातीने गोव्यांत आले व त्यांनीहि सावंत मंडळी ताब्यात घेण्याबद्दलची पुष्कळ खटपट केली परंतु ती सारी व्यर्थच गेली. शेवटी १८४७ त पोर्तुगीज सरकारच्याच मध्यस्तीने सावंत मंडळीपैकी खाशांनां माफी मिळाली तरीपण देवाण घेवाणाच्या तत्वावर कांहीं इसमांना काळेपाणी पहावेंच लागले. अशा रीतीने हाहि प्रयत्न व्यर्थ झाला. ज्ञान कोश विभाग १२ यांत गोव्यांची माहिती पृष्ट (ग) २३९ ते २४४ वर दिलेली आहे परंतु त्यांत बराच विपर्यास आहे. प्रस्तुत माहिती पोर्तुगीज दप्तरांतील कागदपत्रांवरून व इतिहासांतून घेतली आहे. इंग्रजांची मदत पोर्तुगीजांनी मागितली नसून इंग्रजांनी ती त्यांवर लादलेली होती. हे त्या कागदपत्रांतून दिसून येते. सुप्रसिद्ध पोर्तुगीज इतिहासकार पिन्यैरु शागसू यांनीहि आपल्या इतिहासांत अशीच माहिती दिलेली आहे. प्रकरण दुसरें. राजकीय परिस्थिति. एकतंत्री अमलांतील व्यवस्था:-विवेचनाच्या सोयीसाठी एकतंत्री अमलांतील परिस्थिति, सनदशीर राज्यपद्धतींतील परिस्थिति व रिपब्लिकच्या नंतरची परिस्थिति असे विभाग पाडून त्याप्रमाणे सारी माहिती देण्याचा क्रम