पान:गोमंतक परिचय.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण पहिले. दचा किल्ला व कावचा राजवाडा ही ठाणी हस्तगत करून तेथे तळ दिला. त्यांना सामोपचारानेच परत लावण्याविषयी पोर्तुगाल सरकारचा गव्हर्नरला हुकूम आला. त्यास अनुसरून गव्हर्नरने वेलस्लीला खलिता लिहून सैन्य परत घेण्यास कळविलें. वेलस्लीनें जरा माघार घेऊन ८४ वी पलटण खेरीज करून बाकी सैन्य परत बोलाविलें. पण पुढे थोड्याच अवधींत, संपूर्ण ७७ वी पलटण, देशी शिपायांच्या दोन पलटणी व तोफखान्याचे शंभर शिपाई परत गोव्यांत आले. गोव्यावर शत्रूचा हल्ला होण्याचा मुळीच संभव नाहीं असें व्हैग काब्राल याने वेलस्लीला कळविले. परंतु वेलस्लीनें उलट उत्तर केले की, “ तूर्तच्यासारखें गोवें शत्रूच्या हल्ल्याच्या संकटांत केव्हांच नव्हतें." आणि सैन्य कायमच ठेवले. उलट विल्यम क्लार्कनें पोर्तुगीज लष्करावरचे अधिकारहि आपल्यालाच देऊन गव्हर्नरची सत्ताही स्वतःच्या हाती मागितली. व्हैग काब्राल हा गृहस्थ थोडासा उथळ बुद्धीचा व बढाईखोर होता. त्याला पूर्वी इंग्रजी आफिसर आपल्याला सलाम करतात, ह्याचाच आनंद वाटे. परंतु विल्यम क्लार्कचें टुमणे लागतांच त्याच्या डोळ्यांवरची धुंदी पार निघाली. लागलीच आग्वाद व काब येथे जाऊन त्याने इंग्रजी निशाणे लावलेल्या डोलकाठ्या कु-हाडीनें तोडविल्या. तेव्हां इंग्रजांनी त्याला ७० हजार रुपयांच्या तहाहयात पेन्शनची लालूचहि दाखविली; परंतु व्हेग काबालने चवताळून तीही फेटाळली. इतक्यांत बसोरा नांवाच्या जहाजांतून (Amiens) आमियेंच्या तहाची सुवार्ता गोव्यांत आली. अर्थात् त्यापुढे येथे सैन्य ठेवण्यास कोणतीच सयुक्तिक सबब न राहिल्यामुळे, वेलस्लीने तें १८१३ त १४ वर्षांनी परत बोलाविले. परंतु आग्वादचा किल्ला व काबचा राजवाडा मात्र १८१५ चा तह होईपर्यंत इंग्रजांकडेच राहिला. दुसरा प्रयत्न १८३९ त झाला व तो युरोपांतच झाला. पोर्तुगालांतील ब्रिटिश परराष्ट्रीय वकील लॉर्ड हॉवर्ड यांनी ता. १२ मार्च रोजी गोव्यांतील कांहीं अधिकाऱ्यांविरुद्ध अशी तक्रार केली की, ब्रिटिशांविरुद्ध बंड केलेल्या कांहीं फरारी अपराध्यांस त्यांनी मदत दिल्याची कागाळी मुंबईसरकारने केली आहे. शिवाय पोर्तुगीज सरकारकडे ब्रिटिश सरकारचे बरेंच येणेहि निघत आहे. तेव्हां याच्या भरपाईस पोर्तुगीजांचा हिंदुस्थानांतील मुलूख ईस्ट इंडिया कंपनीला देण्याच्या अटीवर पोर्तुगीज सरकारशी बोलणे करण्याचा हुकूम ब्रिटिश सरकारने आपल्याला केला आहे. पोर्तुगालतर्फे मुख्य प्रधान व्हिश्कोंद दसा द बांदर यांनी उत्तरांत असे सांगितले की, “ गोव्याच्या गव्हर्नर जनरलकडून आलेल्या माहि