पान:गोमंतक परिचय.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय __बंड संपल्यानंतर सुमारे तीन वर्षांनी सत्तर प्रांतांत क्याप्टन बाश्त नांवाच्या लष्करी अमलदाराने एक गाय गोळी घालून मारली या निमित्ताने दोघां मराठ्या शिपायांनी परेड चालली असतां त्यावर गोळ्या घालून त्याचा खून केला होता. त्या खुनाच्या कटांत सामील असल्याचा आरोप ठेवून गव्हर्नर गालयाद याने दादा राण्यांसह बंडवाल्यांच्या सर्व प्रमुख इसमांस कोर्टमार्शल भरवून आफ्रिका व तिमोर येथे हद्दपार केले. इ. स. १९१२ तील लुटालूट:-यापुढे १९१२ सालींहि बाळ्ळी महालांतील झील सांवत नांवाच्या इसमाने केवळ वैयक्तिक अन्यायामुळे चिडून लटफाट आरंभिली. त्याला सत्तर प्रांतांतून हिरबा राणे गुळ्ळेकर याने कुमेरी ( नाचण्याची भरड कृषि ) च्या आणेवारीच्या अन्यायाच्या सबबीखाली मदत केली व साऱ्या गोमंतकभर धुमाकूळ घातला. परंतु पहिलेच रिपब्लिकन गव्हर्नर कोसैर द कोश्त यांनी आफ्रिकेंतून लांडी लोकांचे सैन्य आणवून बंड मोडून पुष्कळ इसमांना हद्दपार केले. या पुढील इतिहास म्हणजे चालू घडामोडी. परंतु तो का सब शकत नाही. तेव्हां गेल्या शतकांत ब्रिटिशांनी गोवें घेण्याचा जो प्रयत्न केला होता त्याचीच हकीकत सांगावयाची राहिली. इंग्रजांनी गोवे घेण्याचे केलेले प्रयत्नः-गोंवें घेण्याचे प्रयत्न इंग्रजांनी तीनदां केल्याचे इतिहास सांगतो. पहिला प्रयत्न जनरल मार्किस वेलस्ली यांच्या अमदानींत झाला. युरोपांत त्या वेळी फ्रेंचांशी लढाई चालली होती. १७८५ पासून १७९३ पर्यंत फ्रेंचांच्या विरुद्ध तुम्हाला मदत देतों असें बोलणे इंग्रजांनी पोतंगेज गव्हर्नरांकडे लावलेले होते. परंतु त्यांनी तें फेंटाळूनच लाविलें होतें. पुढे १७९८ त व्हग काब्राल नांवाच्या गव्हर्नरच्या कारकीर्दीत इंग्रजी आडमीरल रैनर ( Reiner ) याने चार लढाऊ जहाजांसह गोव्यांच्या खाडीत प्रवेश केला. व जरूर पडल्यास गोवा सरकारला मदत करण्याचा हुकूम आपल्याला झाला आहे.' असा निरोप त्याने गव्हर्नरला पाठविला. परंतु गव्हर्नरने त्याची मदत आभारपूर्वक नाकारून त्याला परत लाविले. त्यानंतर लागलीच josue utlholf नावाचा इंग्रजी वकील गव्हर्नरशी कांहीं करार करण्याच्या मिषाने गोव्यांत आला तेथेंच चिकटून राहिला. आणि इ. स. १७९९ त कर्नल सर विल्यम क्लाके यांच्या हाताखाली ८४ वी युरोपियन पलटण, ७७ व्या पलटणीचा काही भाग, तोफखाना व देशी शिपायांची दोन बटालियनें गोव्यांत आली व त्यांनी आग्वा