पान:गोमंतक परिचय.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय तीवरून असे दिसून येते की, गोव्याच्या अधिकाऱ्यांनी फरारी ब्रिटिश अपराध्यांकडे ठेविलेल्या व्यवहारामुळे, उभय सरकारांत झालेल्या करारास मुळीच बाधा येत नाही. तेव्हां आपल्या मुंबईच्या अधिकाऱ्यांची माहितीच चुकीची आहे असे म्हणावे लागते. हिंदुस्थानांतील आमचा मुलुख ईस्ट इंडिया कंपनीला देण्याच्या प्रश्नासंबंधाने राणीसरकार (पोर्तुगालांत यावेळी मेरी दुसरी इची कारकीर्द चाल होती ) हिने आपल्याला असा निरोप कळवायला सांगितले आहे की, तो प्रांत म्हणजे आमच्या पूर्वजांच्या पराक्रमांची ऐतिहासिक स्मारकेंच आहेत असे आम्ही समजतो. अर्थातच तो देण्याविषयींचे कोणत्याहि प्रकारचे बोलणे चालवायला आम्ही मुळीच तयार नाही. उलट उभय राष्ट्रांत शेकडों वर्षांचा परस्पर स्नेहाचा संबंध असतांना, अशा प्रकारचे बोलणें ब्रिटिश सरकारने लावावें, याचेच आम्हाला सखेदाश्चर्य वाटते." परंतु हे प्रकरण एवढयानेच संपलें नाही. व्हिकोंद द सा द बांदैर यांच्या मागन वारांव द रीवैर बार्बोझ यांच्या हाती मुख्य प्रधानगिरीची व परराष्ट्रीय खात्यांची सूत्रे येतांच लॉर्ड हावर्डनें त्यांच्याशींहि पुनरेव तेंच बोलणे चालू केलें. आणि गोवा, दमण व दीव या प्रांतांची किंमत ५ लक्ष पौंडांत आकारून ती पोर्तगालाला देऊ केली. परंतु असल्या गोष्टीस हाडाचा पोतुगीज आमरणांत कबूल व्हावयाचा नाही असें सडेतोड उत्तर देऊन बारांव द रिवैर बार्बोझ यांनी हे प्रकरण संपविलें. तिसरा प्रयत्न, वाडी प्रांतांत फोंड सांवत यांनी ब्रिटिशांविरुद्ध इ. स. १८४२ त स्वातंत्र्य युद्ध पुकारले, त्या वेळी करण्यांत आला. त्यांनी इंग्रजांशी चालविलेल्या लढाईत आउटरम साहेबांनी सावंतांचा पुरताच मोड करून, त्यांना कोठेच आसरा मिळेनासें केलें. सावंत मंडळीच्या शिरांनां हजारों रुपयांची बक्षिसेंहि लावली गेली. यावेळी सावंत मंडळीने गोवा सरकारकडे शस्त्रे ठेवून आश्रय मागितला. गोव्यांत र पेस्तामची कारकीर्द चालू होती. त्यांनी सावंताच्या लोकांना अभय वचन देऊन त्यांची उत्तम बरदास्त ठेवली. एकंदर १६१ इसम त्या वेळी शरण आलेले होते व त्यांत सुमारे वीस इसम खानदानीचे होते. ही संधी साधून मुंबई सरकारने क्याप्टन ऑर्थर नांवाच्या अधिकाऱ्याच्या हाताखाली एक लढाऊ जहाज देऊन पणजी येथे पाठविले. त्याने पणजीच्या राजवाड्यावर तोफा रोखून सावंत मंडलीला आपल्या ताब्यात देण्याची मागणी गव्हर्नरकडे केली. गव्हर्नर पेश्तान यांनी ऑर्थर साहेबाचा उत्तम प्रकारे आदरसत्कार केला व “ पोर्तुगालच्या निशाणाच्या