पान:गोमंतक परिचय.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण पहिले. तर गोळी निसटती लागल्यामुळे तडफडणाऱ्या माणसाला फावड्यांचे तडाखे देऊन मग ठार केल्याची बातमीहि युरोपियन वर्तमानपत्र Diario de Noticias. मध्ये प्रसिद्ध झाली ! इतका क्रूरपणा त्या वेळी सरकारने धरला. याच धांदलींत जुवेंकर रावजी राणे यांना सरकारनें कामुर्लीहून पकडून आणले व म्हापशांस आणतांनां शिपायांनी त्यांनां गोळी घालून ठार केले. ही गोष्ट नादोडेंच्या जागांस (पांगे) नांवाच्या ख्रिस्ती कुटुंबाच्या सांगीवरूनच करण्यांत आली, असा त्यावेळी प्रवाद होता. राणे मंडळीनी ह्या कृत्याचा सूड पांग्याच्या घरादाराची राखरांगोळी करून व त्यांच्या पुरुषवर्गाचा क्रूरपणानें नायनाट करून घेतला. ह्या बंडांत राणे मंडळीने हळदुणेची व कोलवाळची इगर्ज व म्हापशेची रेसेबदोरी (खजिन्यांतील तिजोरी) लुटली होती. शिवाय सांग्यावरच्या तिजोरी रेसेबेदोरीवर व इतर कैक ठिकाणी हल्ला केला होता. परंतु केवळ थोड्याशा शिपायानिशी रेसेबेदोरीचा बचाव तेथील आदमिनिस्वादोर जुवांव द बीत याने केला. प्रस्तुत लेखकाच्या घरावर तर बंडवाल्यांनी दोनदा हल्ला केला होता. पहिल्या खेपेला भर दिवसा संध्याकाळी ४ वाजतां दरवाजा फोडण्याच्या प्रयत्नांत आंतील गोळीबारामुळे यश न आल्यामुळे घराला पश्चिम बाजूनें आगदेखील घातली होती. पण मागाहून कुडचड्यावर ठेवलेल्या ठाण्यांतील सरकारी तुकडीची मदत येतांच बंडवाले बाहेर सांपडलेल्या त्याच्या चुलत्याला पकडून बरोबर घेऊन पळून गेले. या बंडांत बारदेशचे व्हिस्कोंद कारवाल्यु, त्यांचे मित्र व अनुयायी सामील असल्याबद्दल सरकारास संशय आल्यावरून त्यांस कांहीं काल ब्रिटीश मुलुखांत अज्ञातवास पत्करावा लागला होता. याच धामधुमीचा फायदा घेऊन घांटमाथ्यावरील इंग्रजी हद्दीतील पठाणांनी श्री मंगेश व श्री शांतादुर्गा या प्रसिद्ध देवालयांवर हल्ला करून देवतांच्या मूर्ति व बहुमोल जवाहिर घेऊन इंग्रजी हद्दीत पलायन केले. या शिपायांचा हात बंडांतून निघतांच त्याचे मूळचे स्वरूप जाऊन त्याला शुद्ध लुटालुटीच स्वरूप प्राप्त झाले. १८९८ त गव्हर्नरच्या जागी लोकप्रिय माशाद हे येतांच त्यांनी जगद्गुरू मठ संकेश्वर यांनां इतमामाने आमंत्रण करून थोडीबहुत त्यांच्या मध्यस्तीने बंडवाल्यांना माफी दिली व बंड शमविलें. ड्युक द पोर्तु इकडून परत जाईपर्यंतच ह्या बंडाप्रीत्यर्थ पोर्तुगाल सरकारने सुमारे १० लाख रुपये खर्च केले.. शिवाय बंडाचा नायनाट होईतोवर स्थानिक सरकारासही बराच खर्च आला.