पान:गोमंतक परिचय.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय नुकतेच परलोकवासी झालेले जनरल गोमिश दे कोश्त हे त्या वेळी क्याप्टनच्या हुद्यावर होते. त्यांच्या हाताखाली सैन्याची तुकडी देऊन सत्तर प्रांतांत त्यांची रवानगी करण्यांत आली. वाटेत मोलें गडावर राण्यांचे तिघेच इसम एका झाडाखाली लपून राहिले होते. त्यांनी या साऱ्या सैन्याला थोपवून धरिलें; दुपारपर्यंत सरकारी सैन्याने गोळ्यांचा पाऊस पाडला. परंतु त्यांनी झाडे मात्र जखमी झाली. शेवटी काडतुसें संपल्यामुळे दोन तोफा मागे टाकून मोर्ले येथूनच सरकारी सैन्य मागे परतले व त्यांनी सांखळी येथे तळ दिला. - पुढे राजबंधु दो आफोंस व गव्हर्नर जनरल राफाJल दे आंद्राद यांच्याबरोबर पोर्तुगीज सोल्जरांची तुकडी आली. तेव्हां सारा सत्तर प्रांत जाळून पोळून उध्वस्त करण्यात आला. गोमंतकांतील बऱ्याच ख्रिस्त्यांना बंडांत सामील असल्याच्या संशयावरून हद्दपारी भोगावी लागली. त्यांतच बेर्नाद फ्रांसीस्क द कोश्त हे गोमंतकाचे सुपुत्र वृद्धावस्थेत दीव येथेच मरण पावले. क्याप्टन गोमिश दे कोश्त यांनी मार्शल लॉच्या आधाराने साऱ्या गोमांतकभर, . विशेषतः नव्या काबिजादींत, दंडेली सुरू केली. तेव्हां हेमाडबासे येथील सूल गांवचे देसाई बाबय सावंत हे हेमाडबार्सेच्या रयतांनां घेऊन दादा राण्याना मिळाले. लुटालुटीला मग ऊतच आला. १८९६ च्या मार्च महिन्यातच गव्हनर राफायल द आंद्राद यांनी अधिकारसत्रे, राजवंधु डयूक द पोतु यांकडे देऊन प्रयाण कल. पातुगालहून ड्यूकनां व्हायसरॉयचे अधिकार तारेनें देण्यांत आले. त्यांनां मुद्दाम प्रयत्नपूर्वकच प्रजेपासून अलग राखण्यांत आले होते. तथापि त्यांच्या लक्षांत सारी परिस्थिति आली. ताबडतोब त्यांनी मेच्या २७ रोजी बंडखोर शिपाई परत शरण येतील तर त्यांनां माफी देण्याचा जाहिरनामा काढला, व लागलीच स्वदेशी गेले. तेव्हांपासून शिपायांचे बंड शमत चालले ___ड्यक द पोर्त परत स्वदेशी जातांच गोव्याचा कारभार रॉयल कमीशनरच्या हृद्यान्वयें नेव्हिश फेरैर यांनी हाती घेतला. हे गृहस्थ लुझो इंडियन समाजाच्या आहारी पूर्णपणे पडले होते. अधिकारसूत्रे ग्रहण करतांक्षणीच त्यांनी समय दिसणाऱ्या व लोकांच्या जीवितवित्तावर हल्ला करणाऱ्या माणसांनां पकडून ठार करण्याचा हुकूम सोडला, व तो अमलांत न आणणाऱ्या मुलकी किंवा लष्करी अमलदाराला बडतर्फीची शिक्षाहि त्याच हुकुमांत ठरविली. ह्या हुकुमान्वयें पुष्कळ अपराधी निरपराधी इसमांनां फोंडे येथे गोळी घालून ठार करण्यांत आले. एकदां